Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Share Market) चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टीची (Nifty) घोडदौड सुरु आहे. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत व्यवहार करताना दिसत आहेत. बाजार उघडताच सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 60000 पार पोहोचला. निफ्टीचाही तेजीत व्यवहार सुरु असून निफ्टी 17850 च्या वर पोहोचला आहे. आज शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स 250 अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. 


कशी झाली सुरुवात?


आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला बीएसई (BSE) सेन्सेक्स 118.41 अंकांनी म्हणजे 0.20 टक्क्यांच्या वाढीनंतर 60,550 वर उघडला. याशिवाय, एनएसई (NSE) चा निफ्टी 69.45 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,840 वर व्यवहार करत आहे.


बँक निफ्टी तेजीत


आज बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी 0.24 टक्क्यांच्या वाढीनंतर 41300 वर पोहोचला आहे.


'या' शेअर्सचा तेजीत व्यवहार


एम अँड एम (M&M), रिलायंस, TCS, विप्रो (Wipro), हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank), एअरटेल (Bharti Airtel), ITC, मारुती (Maruti), अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement), बजाज फायनांस (Bajaj Finance), टाटा स्टील (TATA Steel) हे शेअर्स तेजीत आहेत.


'हे' शेअर्स गडगडले


ॲक्सिस बँक (Axis Bank), सनफार्मा (SunPharma), पावरग्रीड (Powergrid), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) आणि इंडसइंड (Indusund Bank), एशियन पेंट्स (Asian Paint) हे शेअर्स गडगडले आहेत.


वेगवेगळ्या सेक्टरची स्थिती काय?


आज शेअर बाजारात बँक, फायनान्शियल, ऑटो, एफएमसीजी, आयटी आणि प्रायव्हेट बँक या क्षेत्रांमध्ये तेजी दिसून येत आहे, पण फार्मा, मेटल, मीडिया, रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, तेल आणि गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. 


सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय?


सेन्सेक्समधील 19 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 11 शेअर्स घसरत आहेत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी 25 शेअर्स  तेजीत आहेत आणि 25 शेअर्स  घसरले आहेत.


भारत इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर


भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार जागतिक इक्विटी बाजारांमध्ये (World's Top Equity Market) पुन्हा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे फ्रान्सने भारताला इक्विटी बाजारात काही काळासाठी मागे टाकलं होतं. पण आता अदानी शेअर्सची बाजारातील परिस्थिती सुधारताना दिसत आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सला मागे टाकत पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Online Medicine App : विनापरवाना औषधं विकणं महागात, ई-फार्मसींना DCGI ची कारणे दाखवा नोटीस