Share Market Opening Today 27 March 2023 : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने (Stock Market) जोरदार सुरुवात पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स (Sensex) 57600 च्या वर व्यवहार करत असून निफ्टी (Nifty) 17000 च्या जवळ पोहोचला आहे. यूएस बाजारामुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळत आहे. आज भारतीय बाजार उघडताच सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 100 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळत आहे आणि निफ्टी 17,000 च्या अगदी जवळ आला आहे.


Share Market Opening Bell : आज शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?


आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 57,566 वर उघडला, पण काही मिनिटांतच विक्री झाल्यामुळे निर्देशांक 57,501 वर घसरला आहे. ऑटो आणि बँकिंग शेअरचा बाजारावर दबाव आहे. सध्या किंचित घसरणीसह व्यापार सुरू आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 398 अंकांनी घसरून 57,527 वर बंद झाला होता. 


Share Market Opening Bell : संमिश्र जागतिक संकेतामुळे चढउतार


संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात चढउतार दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत दिसत आहेत. सेन्सेक्समध्ये सुमारे 200 अंकांची वाढ दिसून येत आहे, तर निफ्टीने 17000 चा टप्पा पार केला आहे. आशियाई बाजारात आज संमिश्र कल दिसत असला तरी सध्या सेन्सेक्स 186 अंकांनी वधारला असून 57714 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी 60 अंकांनी वाढून 17005 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 


Share Market Opening Bell : कोणत्या शेअर्समध्ये तेजी-घसरण?


आजच्या व्यवहारात बँक, फायनान्स आयटी आणि मेटल शेअर्स निफ्टीमध्ये तेजीत व्यवहार करत आहेत. ऑटो आणि PSU बँक शेअर्समध्ये विक्री होत असताना दिसत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स 30 चे 18 शेअर्स तेजीसह आणि 12 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. 


Share Market Opening Bell : कोणत्या शेअर्समध्ये तेजी-घसरण?


आजच्या टॉप गेनर्स (Top Gainer Stock) शेअर्समध्ये बजाज फायनान्स (Bajaj Finance), भारती एअरटेल (Airtel), एनटीपीसी (NTPC), कोटक बँक (Kotak Bank), टाटा स्टील (Tata Steel)यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या (Top Loser Stock) शेअर्समध्ये  महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), टायटन (Titan), आयटीसी (ITC), ॲक्सिस बँक (Axis Bank),  हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), सन फार्मा (Sun Pharma), भारतीय स्टेट बँक (SBI), एचसीएल (HCL) या शेअर्सचा समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CNG-PNG Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजी-पीएनजीचे दर वाढणार? 1 एप्रिलपासून नवे नियम लागू होण्याची शक्यता