Share Market Opening Bell : नवीन वर्षाची (New Year 2023) सुरुवात शेअर बाजारात (Stock Market Opening Bell) चांगली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीच (Nifty) घोडदौड पाहायला मिळत आहे. नवीन वर्षात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत. आज शेअर बाजार (Share Market) सुरु होताच सेन्सेक्स 60,800 च्या पुढे तर निफ्टी 18100 च्या पुढे पोहोचला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही हिरव्या चिन्हावर म्हणजे तेजीत व्यवहार करताना दिसत आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय?
सध्या, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टी 26 अंकांनी वेगाने व्यवहार करत असून त्याच्या 23 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एक शेअरमध्ये कोणताही बदल झालेला नसून त्याचा व्यवहार सुरु आहे.
वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराचा शुभारंभ
आज शेअर बाजार उघडताना बीएसई (BSE) सेन्सेक्स 30.50 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 60,871.24 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टी 26.40 अंकांच्या म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 18,131.70 वर उघडला आहे.
'या' सेक्टरमध्ये तेजी
आज बँक, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, मेटल शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे. तर हेल्थकेअर आणि फार्मा कंपन्यांचे शेअर 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्समध्ये तेजी
आज सुरुवातीपासूनच निफ्टीच्या टाटा स्टील, हिंदाल्को, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, ब्रिटानिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्मध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, एसबीआय, रिलायन्स, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एचयूएल, अॅक्सिस बँक आणि नेस्ले यांचा फायदा होत आहे.
गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 995.45 अंकांनी वधारला होता. गेल्या आठवड्यात आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1,35,794.06 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारात 11,119 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
सरकारच्या उत्पन्नात वाढ, डिसेंबरमध्ये GST संकलनात 15 टक्के वाढ, तिजोरीत 1.49 लाख कोटी रुपये