GST Revenue : नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच आर्थिक आघाडीवर चांगली बातमी आली आहे. जीएसटी संकलनाच्या आकड्यांनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. वित्त मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.


डिसेंबर 2022 मध्ये एकत्रित GST महसूल 1,49,507 कोटी रुपये आहे. यामध्ये CGST रु. 26,711 कोटी, SGST रु. 33,357 कोटी, IGST रु. 78,434 कोटी (माल आयातीवर जमा केलेल्या रु. 40,263 कोटींसह) आणि रु. 11,005 कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा केलेल्या रु. 850 कोटींसह) यांचा समावेश आहे असं अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.




सलग 10व्या महिन्यात विक्रम केला


डिसेंबर हा सलग 10 वा महिना ठरला आहे जेव्हा GST महसूल 1.40 लाख कोटींहून अधिक झाला आहे. नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी वाढून 1.46 लाख कोटी रुपये झाले होते. एप्रिलमध्ये संकलनाने 1.68 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. आत्तापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा जीएसटी संकलन ऑक्टोबरमध्ये 1.52 लाख कोटी रुपये झाला आहे.


डिसेंबर 2022 मध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 8 टक्क्यांनी अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल अहवाल कालावधीत 18 टक्क्यांनी वाढला.


जीडीपीमध्ये कॉर्पोरेट कराचा वाटा वाढला
कॉर्पोरेट कर संकलन 2 वर्षांच्या अंतरानंतर 2021-22 या आर्थिक वर्षात GDP च्या 3 टक्क्यांहून अधिक झाले. ही वाढ वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे भारतीय उद्योगाच्या नफ्यात सुधारणा दर्शवते. तथापि, कॉर्पोरेट कर संकलन आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये नोंदवलेल्या GDP च्या 3.51 टक्के पातळीपेक्षा अजूनही कमी आहे.


या डिसेंबर महिन्यात केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल अनुक्रमे ६३,३८० कोटी आणि ६४,४५१ कोटी रुपये होता. नोव्हेंबर महिन्यात 7.9 कोटी ई-वे बिले व्युत्पन्न झाली, जी ऑक्टोबरमध्ये व्युत्पन्न झालेल्या 7.6 कोटी ई-वे बिलांपेक्षा खूप जास्त होती. 


महत्वाच्या बातम्या


Investment Plans : मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत! नवीन वर्षात येथे गुंतवणूक करा, मिळेल जबरदस्त परतावा