Telecom Stocks Price in India : देशात नुकतीच 5G सेवा (5G Service) सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात 5G इंटरनेट (5G Internet) सेवा देशातील फक्त काही शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्लीसह 13 देशांचा समावेश आहे. 5G नेटवर्कमुळ टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Telecom Company) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. लिलावात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमची खरेदी केली. त्यामुळे लवकरच या कंपन्यांकडून 5G सर्विस लाँच करण्यात येईल. त्याआधी या टेलिकॉम कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 


एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी


जिओ आणि एअरटेल टेलिकॉम कंपन्यांकडून लवकरच 5G सेवा लाँच करण्यात येईल. जिओ दिवाळीपर्यंत 5G नेटवर्क सुरु करेल. त्यामागोमाग एअरटेलचं 5G नेटवर्क चालू होईल. 5G सर्विस लाँच होण्याआधी टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एयरटेल कंपनीच्या शेअरने (Airtel Share Price) 52 आठवड्यांमधील विक्रमी पातळी गाठली आहे. एअरटेलचे शेअर 800 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.


सध्या एअरटेलच्या शेअरची किंमत काय?


30 सप्टेंबर 2022 रोजी, NSE वर एअरटेलच्या शेअर्सची कमी किंमत 761.45 रुपये होती आणि कमाल किंमत 809 रुपये होती. त्यानंतर 5G लाँच झाल्यावर एका दिवसातच शेअर्सच्या किमतीत 47 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एअरटेलच्या शेअरची सध्याची किंमत 809 रुपये आहे. एअरटेलच्या शेअर्सची ही आतापर्यंतची विक्रमी किंमत आहे. एअरटेलच्या शेअरची क्लोजिंग प्राईज 799.60 रुपये आहे.


मार्च 2024 पर्यंत देशभरात एअरटेल 5G 


देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक एअरटेलने (Airtel) 5G इंटरनेट सेवेबाबतच्या भविष्यातील योजना सांगितल्या आहेत. भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलंय की,  एअरटेलने चार महानगरांसह 8 शहरांमध्ये 5G टेलिकॉम सेवा सुरू केली आहे. मार्च 2024 पर्यंत देशभरात या सेवा पुरवण्याची कंपनीची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.