Stock Market Today Opening Bell : आज आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टी (Nifty 50) तेजीत व्यवहार करत आहे. भारतीय शेअर बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा चांगला परिणाम पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये 250 अंकांची वाढ होऊन तो 60 हजारांपार पोहोचला आहे, तर निफ्टीही 18 हजारांवर व्यवहार करत आहे. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 289 अंकानी उसळी घेत 60550 वर उघडला. तसेच निफ्टी 82 अंकानी वाढून 18033 वर उघडल्याचं पाहायला मिळालं. 


सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड


सध्या शेअर बाजारात सेन्सेक्स 317 अंकानी उसळी घेत 60578 वर आहे आणि निफ्टी 82 अंकानी वाढून 18038 वर व्यवहार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. निफ्टीचे एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, स्टेट बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स तेजीत आहेत. तर नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.


सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय?


सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स तेजीत असून. 8 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय आज निफ्टीमध्ये 50 पैकी 36 शेअर्श तेजीसह व्यवहार करत आहेत आणि इतर 14 शेअर्समध्ये प्रचंड वाढ नोंदवली जात आहे.


अशी झाली आजच्या सत्राची सुरुवात


आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली आहे. बीएसई सेन्सेक्स आज 289.32 अंकांच्या म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 60,550.50 वर उघडला. तर, NSE चा निफ्टी 76.55 अंकांनी म्हणजेच 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 18,033.15 वर उघडला.


कशी होती प्री-ओपनिंग?


प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारातील निफ्टी 81.65 अंकांच्या म्हणजेच 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 18038 वर व्यवहार करत होता. याशिवाय सेन्सेक्समध्ये 393.41 अंकांच्या म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या उसळीसह 60654 चा स्तर पाहायला मिळत आहे.


शेअर बाजाराची आजची रणनीती काय असेल?


शेअर इंडियाचे व्हीपी डॉ. रवी सिंग यांनी सांगितले की, आज देशांतर्गत शेअर बाजार 17950-18000 च्या आसपास उघडण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर दिवसभराच्या व्यवहारात 17800-18200 च्या श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे. आज PSU बँक, मेटल, आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मजबूती दिसून येईल. याशिवाय एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रात घसरण होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Petrol Diesel Price : देशात आज इंधन दर वाढले की, कमी झाले? Latest किमती, जाणून घ्या