Share Market Opening Bell : भारतीय शेअर बाजाराची (Stock Market) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज घसरणीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) तोट्यात व्यवहार करत आहेत. बीएसई सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 57,391 वर तर, एनएसई निफ्टी 170 अंकांनी घसरून 16,922 वर व्यवहार करत आहे. 


Share Market Updates : जागतिक बाजाराचा परिणाम


कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज बाजाराची सुरुवात घसरणीनेसह सुरुवात झाली. सध्या सेन्सेक्स 521 अंकांच्या म्हणजेच 0.90 टक्क्यांच्या घसरणीसह 57,468 वर आहे. तर, निफ्टी 157.65 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्क्यांनी 16,945.55 च्या पातळीवर घसरला आहे.


Share Market Updates : बाजार सुरु होताच कशी होती परिस्थिती?


आजच्या ओपनिंग सत्रामध्ये BSE सेन्सेक्स 216.38 अंकांच्या म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 57,773 वर व्यवहार करत होता. NSE चा निफ्टी 33.45 अंकांच्या म्हणजेच 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 17066 च्या पातळीवर उघडला. आज देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीसह निराशाजनक सुरुवात झाली आहे. 


Share Market Updates : सेन्सेक्ससह निफ्टीही गडगडला


आज सुरुवातीच्या सत्रात बीएसई निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 350 हून अधिक अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय एनएसई निर्देशांक निफ्टीमध्येही बाजार उघडताच 17000 च्या खाली घसरला. बँक निफ्टी 39300 च्या खाली आला. आयटी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे शेअर बाजार दबाव वाढला असून बाजार कोसळत आहे.


Share Market Updates : शेअर बाजारातील सध्याची स्थिती


शेअर बाजारातील घसरण आणखी वाढली आहे. निफ्टीच्या 50 पैकी 43 शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स घसरताना दिसून येत आहेत. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 1 शेअर घसरला आहे. पॉवर, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सध्या निफ्टी 169.40 अंकांच्या म्हणजेच 0.99 टक्क्यांच्या घसरणीसह 16,917.10 च्या पातळीवर दिसत आहे. त्याच वेळी, सेन्सेक्स 575.43 अंकांनी म्हणजे 99 टक्क्यांनी घसरला.


Share Market Updates : 'या' शेअर्सची कमाई


बीपीसीएल, दिवीज लॅबोरेटरीज, टायटन, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि ओएनजीसी शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.


Share Market Updates : 'हे' शेअर्स तोट्यात


अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक शेअर्स सर्वाधिक तोट्यात आहेत.


Share Market Updates : प्री ओपनिंगमध्ये कशी होती स्थिती?


आज प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची हालचाल कमकुवत होती. टाटा कंझ्युमर, आरव्हीएनएल आणि ग्लेनमार्क शेअर्स प्री-ओपनिंगमध्ये फोकसमध्ये पाहायला मिळाले. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 166.59 अंकांनी म्हणजेच 0.29 टक्क्यांनी 57,773.52 च्या पातळीवर घसरला होता तर, निफ्टी 33.45 अंकांच्या म्हणजेच 0.20 टक्क्यांच्या कमजोरीसह 17,066.60 च्या पातळीवर होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? झटपट चेक करा आजचे दर