Share Market Opening Bell : आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टीची (Nifty 50) घोडदौड पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजीत व्यवहार सुरु झाले मात्र हे चित्र फार काळ टिकू शकलं नाही. या आठवड्यात मंगळवारी होळीच्या सुटीमुळे बाजार बंद होता मात्र त्यानंतरही बाजारात तेजी कायम असल्याचं दिसून आलं. आज गुरुवारी बाजार तेजीत सुरु झाला मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव पाहायला मिळाल्यानं बाजार घसरला.


Share Market Opening : बाजारातील परिस्थिती काय?


आज सकाळी भारतीय शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 119 अंकांच्या वाढीसह 60,467 वर उघडला. निफ्टीही 18 अंकांच्या वाढीसह 17,772 वर उघडला. बाजाराचा सुरुवातीचा टप्पा पाहता आजही तेजीच सत्र कायम राहील असं वाटत होतं, मात्र लवकरच जागतिक बाजाराचा दबाव गुंतवणूकदारांवर दिसू लागला आणि त्यांनी नफ्यासाठी विक्री करण्यास सुरुवात केली. सततच्या विक्रीमुळे सकाळी 9.40 वाजता सेन्सेक्स 131 अंकांनी घसरून 60,217 वर पोहोचला. तर, निफ्टी 35 अंकांच्या घसरणीसह 17,720 वर पोहोचला.


Share Market Opening : तेजीत सुरु झाल्यावर बाजारात घसरण


 भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी सकाळी तेजीसह व्यवहाराला सुरुवात झाली, परंतु लवकरच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्यावर घसरण दिसू लागली. आज जागतिक बाजारातील घसरणीचा दबाव देशांतर्गत गुंतवणूकदारांवरही दिसून येत आहे. त्यामुळे मागील सत्रात बाजार काहीशा वाढीसह बंद झाला होता. आज, सुरुवातीच्या व्यवहारात, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील सारख्या समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.


Share Market Opening : प्री- ओपनिंगमध्येही चांगले संकेत


आज व्यवहार सुरू होण्यापूर्वीच बाजार जवळपास स्थिर राहण्याचे संकेत मिळत होते. देशांतर्गत शेअर बाजार आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात स्थिर राहू शकतो. प्रो-ओपन सत्रात, BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही 0.25 टक्क्यांनी वाढलं.


Share Market Opening : अदानी शेअर्सची घोडदौड


अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समधील तेजीचं सत्र कायम आहे. समूहाचे शेअर्सचा आज सलग सातव्या दिवशी तेजीत ( (Adani Stocks Rally) व्यवहार सुरु आहे. आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच समूहाचे सर्व 10 शेअर्स आघाडीवर होते. तर बाजार सुरु होताच त्यामधील पाच शेअर्स अप्पर सर्किटमध्ये (Adani Share Upper Circuit) होतं.


'हे' शेअर्स तेजीत


हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.


'हे' शेअर्स घसरले?


रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


SBI FD Interest Rate : SBI कडून ठेवीदारांसाठी बंपर ऑफर, ठेवींवर 7.9 टक्के व्याज, भरघोस नफा मिळवण्याची संधी