Share Market Opening Bell:  आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) तेजीचे संकेत दिसत आहेत. आशियाई शेअर बाजारात (Asian Share Market) संमिश्र संकेत दिसून येत आहेत. एसजीएक्स निफ्टीमध्ये (SGX Nifty) तेजी दिसून आली. बँक निफ्टीतही (Bank Nifty) तेजी दिसून येत आहे. आज बाजारात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. 


गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात सुरुवातीच्या काही तासांमध्ये तेजी दिसून आली होती. त्यानंतर बाजार बंद होताना नफावसुलीचा जोर दिसल्याने बाजारात घसरण झाली. 


आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 178.46  अंकांनी वधारत  59,381.36   अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58.902 अंकांच्या तेजीसह  17,622  अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 275 अंकांच्या तेजीसह 59,477.90 अंकांवर व्यवहार करत होता. तर, 75.55 अंकांच्या तेजीसह 17,639.50 अंकांवर व्यवहार करत होता.  


आज बाजारात आयटी सेक्टर, मीडिया आणि मेटल शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. तर, इतर सेक्टोरियल इंडेक्समध्ये तेजीचे संकेत दिसून येत आहेत.  मिड कॅप इंडेक्समध्ये आज जवळपास 0.3 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 


सेन्सेक्स निर्देशांकात समावेश असणाऱ्या 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. अॅक्सिस बँकेतजवळपास 6 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, टायटन, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय आणि सन फार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, एल अॅण्ड टी, मारूती, विप्रो, आयटीसी, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 


प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची स्थिती 


आज शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात तेजी दिसून आली. बीएसईचा निर्देशांक 137 अंकांच्या तेजीसह 59340 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 29 अंकांच्या तेजीसह 17593 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. 


गुरुवारी बाजारात तेजी 


गुरुवारी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 95 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 51 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,202 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.30 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,564 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये मात्र 273 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 40,099 अंकांवर स्थिरावला होता.