Share Market Opening Bell : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात चांगली झाली. बाजारात आज खरेदीचे संकेत दिसून येत आहेत. बाजारातील सगळ्या सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे. सोमवारी बाजार बंद होताना तेजी दिसून आली होती.
आज बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 415.68 अंकांच्या तेजीसह 59,556.91 अंकांवर खुला झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 148.15 अंकांच्या तेजीसह 17,770 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 660 अंकांच्या तेजीसह 59,801.66 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 197 अंकांच्या तेजीसह 17,819.30 अंकांवर व्यवहार करत होता.
बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, निफ्टीतील सर्व 50 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच निफ्टीने काही मिनिटाच्या अवधीतच 17800 चा टप्पा पार केला.
मेटल शेअरमध्ये 1.61 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. बँक सेक्टरमध्ये 1.30 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. निफ्टी ऑटोमध्ये 1.48 टक्के, आयटी सेक्टरमध्ये 1.5 टक्क्यांची तेजी दिसत आहे. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 3.12 टक्क्यांची तेजी दिसून आली. टाटा स्टीलमध्ये 1.9 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.75 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. अॅक्सिस बँक 1.75 टक्के, एचसीएल टेकमध्ये 1.74 टक्क्यांनी वधारला आहे.
सोमवारी बाजार वधारला
सलग तीन दिवसांच्या घसरणीला सोमवारी ब्रेक लागल्याने शेअर बाजार काही अंशी वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 91 अंकांची वाढ झाली. सोमवारी, सेन्सेक्स 59,141 अंकांवर, तर निफ्टी 17,622 अंकावर स्थिरावला. सोमवारी, शेअर बाजारातील 1665 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1852 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 127 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: