Share Market Opening Bell :  भारतीय शेअर बाजारात  (Share Market) आज तेजीचे संकेत दिसून येत आहेत. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. बुधवारी झालेल्या घसरणीनंतर आज बाजार सावरल्याचे चित्र आहे. बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर वधारले आहेत. बुधवारी अमेरिकन शेअर बाजार घसरला होता. त्याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसून आला. मात्र, आज अमेरिकन आणि आशियाई बाजारात सकारात्मक चित्र दिसून आले. 


प्री-ओपनिंग सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी वधारले होते. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत 60460 अंकांवर व्यवहार करत होता. तर, स निफ्टी 18050 च्या पातळीवर होता. सकाळी 9.35 वाजता सेन्सेक्स 214 अंकांनी वधारत 60,560.97 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 64 अंकांनी वधारत 18,067.75 अंकावर व्यवहार करत होता. 


बँक निफ्टीचा उच्चांक 
 
आज शेअर बाजारात बँक निफ्टीने उच्चांक गाठला आहे. हँक निफ्टीमध्ये 400 हून अधिक अंकांची उसळण दिसून आली. सध्या बँक निफ्टी 41806  अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टीतील सर्व 12 बँकेचे शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. आयसीआयसीआय बँकेने उच्चांक गाठला आहे. IDFC First Bank च्या शेअर दरात तीन टक्क्यांची तेजी दिसत आहे. फेडरल बँकेचा शेअर दरही दोन टक्क्यांनी वधारला आहे. 


बाजार सावरला 


बुधवारी, सकाळी झालेल्या जोरदार घसरणीनंतर शेअर बाजार (Share Market) पुन्हा सावरला. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 60 हजार अंकांवर बंद झाला असून निफ्टीने (Nifty) पुन्हा एकदा 18 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना निर्देशांकात घसरण दिसून आली. मात्र, सकाळच्या तुलनेत शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 224.11 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांची घसरणीसह  60,346 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66.30 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 18,003 अंकांवर बंद झाला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: