Share Market Opening Bell: जागतिक पातळीवर शेअर बाजारात असलेल्या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह सुरू झाले. कच्च्या तेलाच्या दरात घट दिसून येत असली तरी बाजारात तेजीचा जोर दिसत आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देंशांक सेन्सेक्स (Sensex) 157 अंकांच्या तेजीसह 61,667 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 58 अंकांच्या तेजीसह 18326 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेनसेक्स 175 अंकांनी वधारत 61,686.12 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 51 अंकांच्या तेजीसह 18,318.95 अंकावर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात मेटल्स क्षेत्र वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, इन्फ्रा, एफएमसीजी, एनर्जी सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरचे दरही वधारले आहेत. निफ्टी 50 मधील 39 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, 11 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, तीन कंपन्याच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी निर्देशांक 42,839 अंकांवर व्यवहार करत आहे.
आज बाजारात, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स 2.66 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. अपोलो रुग्णालयात 1.33 टक्के, यूपीएल 1.29 टक्के, एचडीएफसी लाइफ 1.08 टक्के, बीपीसीएल 1.05 टक्के, ओएनजीसी 0.81 टक्के, इंडसइंड बँक 0.72 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.55 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 1.74 टक्के, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर दरात 0.25 टक्के, भारती एअरटेलच्या शेअर दरात 0.34 टक्के, अदानी पोर्ट्स 0.32 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 0.19 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. त्याशिवाय, नेस्ले 0.15 टक्के, सन फार्मा 0.12 टक्के, टायटनच्या शेअर दरात 0.08 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
बुधवारी बाजार सावरला
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागल्याने सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) निर्देशांकात घसरण दिसून आली. बँकिंग स्टॉक्सने (Banking Stocks) बाजार काही प्रमाणात सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 91 अंकांनी वधारत 61,510 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 अंकांनी वधारत 18,267 अंकांवर बंद झाला.