Share Market Opening Bell: दिवाळीच्या सुट्टीनंतर शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली. बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आज बाजारात तेजी राहण्याचे संकेत आहेत. सेन्सेक्स (BSE Sensex) 350 अंकांनी वधारला तर, निफ्टी (NSE Nifty)17800 अंकांजवळ खुला झाला. 


बुधवारी, पाडवा आणि नवीन वर्षानिमित्त शेअर बाजारातील व्यवहार बंद होते. मंगळवारी गुंतवणूकदारांकडून नफावसुली दिसून आली. त्यानंतर आज गुरुवारी शेअर बाजारात खरेदीचा संकेत दिसून येत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 59,792.32 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17,771.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 115.65 अंकांनी वधारत 17,771.40 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 382.72 अंकांनी वधारत 59,926.68 अंकांवर व्यवहार करत होता. 


 बँक निफ्टीमध्ये आज तेजी दिसून येत आहे. आयटी सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. मेटल शेअरमध्ये 2.26 टक्क्यांची उसळण दिसून येत आहे. तर, रियल्टी शेअर 1.20 टक्क्यांनी वधारला आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये 1.10 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.  सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअरच्या दरात तेजी दिसून येत आहे. तर, 7 शेअरच्या दरात घसरण दिसून येत आहे.  टायटन, टाटा स्टील, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेलच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 


आयटीसी, एनटीपीसी, एचयूएल, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, इन्फोसिस, मारुती सुझुकी, एचसीएल टेक आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. 


मंगळवारी बाजारात घसरण


सोमवारी झालेल्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये जोरदार तेजी दिसून आली. त्यानंतर मंगळवारी बाजारात नफावसुली दिसून आली. सेन्सेक्समध्ये (Sensex) 287 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये (Nifty) 74 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स 59,543 अंकांवर स्थिरावला तर, निफ्टी 17,656 अंकांवर बंद झाला. एकूण 1378 समभागामध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर 1951 समभागामध्ये घसरण झाली. 106 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: