Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून असलेल्या तेजीला आज ब्रेक लागण्याचे संकेत आहेत. आज बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) व्याज दरात वाढ केल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेवरही (Reserve Bank Of India) व्याज दर वाढवण्याचा दबाव राहण्याची शक्यता आहे. 


आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 61,156.89  अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 18,177.90 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 123 अंकांच्या घसरणीसह 60,997.56 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 29.85 अंकांच्या घसरणीसह 18,115.55 अंकांवर व्यवहार करत होता.


निफ्टी 50 निर्देशांकात  सन फार्मा,  हिंदाल्को, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, आयटीसीच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसून येत आहे. तर, भारती एअरटेल, आयशर मोटर्स, टायटन, मारुती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 निर्देशांकातील 25 कंपन्यांचे शेअर दर घसरले असून 25 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 13 कंपन्यांचे शेअर दर वधारले असून 17 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. 


प्री-ओपनिंग सत्रात बाजार


प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. सकाळी 9.02 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 327.09 अंकांच्या घसरणीसह  60794.26 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 23.70 अंकांच्या घसरणीसह 18121.70 अंकांवर व्यवहार करत होता. 


मंगळवारी बाजारात तेजी 


मंगळवारी बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 374 अंकांनी वधारला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 133 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स 61,121 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक 18,145 अंकांवर स्थिरावला. 


सेन्सेक्सने सोमवारी 60 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर मंगळवारी 61 हजारांचाही टप्पाही पूर्ण केला. निफ्टीनेही मंगळवारी पुन्हा एकदा 18 हजारांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारात मंगळवारी 1765 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1579 शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: