Share Market Opening :  शेअर बाजारातील व्यवहाराची (Share Market) सुरुवात सपाट झाली असली तरी विक्रीचा दबाव असल्याचे संकेत आहेत. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nity) निर्देशांक किंचीत वधारत सुरू झाले. मात्र, त्यानंतर घसरण सुरू झाली. 


आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स 68.10 अंकांच्या तेजीसह 55,834  अंकावर खुला झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 1.90 अंकांनी वधारत 16,632 अंकांवर खुला झाला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव दिसल्याने घसरण सुरू झाली. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 327 अंकांच्या घसरणीसह 55,438.87 अंकांवर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी निर्देशांकात 97 अंकांची घसरण दिसत असून 16,533.20    अंकांवर व्यवहार करत आहे. 
 
निफ्टी निर्देशांक किंचीत वधारला. निफ्टी 50 मधील सध्या 12 शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. तर, 38 शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे. बँक निफ्टीमध्ये 127 अंकांची घसरण दिसून येत आहे. 


मीडिया, मेटल आणि पीएसयू बँक सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टर निर्देशांकात घसरण सुरू आहे. तर, आयटी क्षेत्रता 1.25 टक्क्यांची घसरण झाली आहे.  फार्मा शेअरमध्ये 1.05 टक्के आणि हेल्थकेअरमध्ये 1.02 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


बजाज फिनसर्व्ह शेअर दरामध्ये 2.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा स्टीलमध्ये 0.90 टक्के, ओएनजीसीमध्ये 0.89 टक्के, युपीएलमध्ये 0.69 टक्के आणि बजाज फायनान्स शेअरमध्ये 0.46 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.  


दरम्यान, मागील आठवड्याच्या तेजीनंतर सोमवारी शेअर बाजारात (Share Market Updates) नफावसुली दिसून आली. नफावसुलीने जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्स (Sensex), निफ्टीत (Nifty) घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 306.01 अंकांच्या घसरणीसह 55,766.22  अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक 88.45 अंकांच्या घसरणीसह 16,631.00 अंकांवर स्थिरावला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: