Share Market Opening Bell: गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजार (Share Market) सावरत असल्याचे चित्र आहे. भारतीय शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहे. आशियाई शेअर बाजारात (Asian Share Market) घसरण झाल्यानंतरही भारतीय शेअर बाजार वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 187 अंकांच्या तेजीसह  58594 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 58 अंकांनी वधारत 17601 अंकांवर खुला झाला. 


आज शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 46 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्सच्या 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर दोन कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. सकाळी 9.49 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 70 अंकांनी वधारत 58,837.31 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 10 अंकांच्या तेजीसह 17,553.75 अंकांवर व्यवहार करत होता. 


या शेअरमध्ये तेजी 


एनटीपीसीच्या शेअर दरात 2.33 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.53 टक्के, कोटक महिंद्रा 1.13 टक्के, पॉवरग्रीड 0.99 टक्के, बजाज फायनान्स 0.88 टक्के, अॅक्सिस बँक 0.64 टक्के, टीसीएस 0.64 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.62 बँक टक्क्यांनी वधारला आहे. 


या शेअरमध्ये घसरण


इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 0.55 टक्के, श्री सिमेंट 0.54 टक्के, बीपीसीएल 0.41 टक्के, ग्रासिम 0.34 टक्के, हिंदाल्को 0.31 टक्के, मारुती सुझुकीच्या शेअर दरात 0.24 टक्के, हीरो मोटोकोर्पच्या शेअर दरात 0.16 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. 


गुरुवारी बाजारात घसरण 


सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून (Share Market Fallen) आला. सकाळी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरलाही होता. मात्र, विक्रीच्या सपाट्याने शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 770.48 अंकांच्या घसरणीसह (Sensex Falls)  58,766.59 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीत 216.50 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,542.80 अंकांवर बंद झाला. 


शेअर बाजार बंद झाला तेव्हा 1904 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 1446 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 142 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी बाजार उघडताच 700 हून अधिक अंकांची घसरण झाली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या: