Share Market Opening Bell : भारतीय शेअर बाजारात आज खरेदीचा जोर असल्याचे दिसून येत आहे. प्री-ओपनिंगमध्ये निफ्टीने 18 हजार अंकाचा टप्पा (Nifty Cross 18 Thousand level) ओलांडला. निफ्टीने (Nifty) दुसऱ्यांदा हा टप्पा गाठला आहे. बँकिंग शेअरमध्ये असलेल्या तेजीने शेअर बाजार वधारला असल्याचे दिसून येत आहे. 


आज, शेअर बाजारात सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीचे संकेत दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 293.16 अंकांनी वधारत 60,408 अंकांवर खुला झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टी (Nifty) 108.10 अंकांनी वधारत 18,044 अंकांवर खुला झाला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 423 अंकांच्या 60,538.86  अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 122 अंकांनी वधारत 18,058.40 अंकांवर व्यवहार करत होता. 


ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये जवळपास एक टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, वित्तीय क्षेत्रात 0.93 टक्क्यांची तेजी दिसत आहे. मेटल, बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. आयटी सेक्टरमध्ये 0.44 टक्क्यांची तेजी दिसून आली. 


सेन्सेक्स निर्देशांकामधील जवळपास सर्वच 30 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ दिसून येत आहे. यामध्ये भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आणि कोटक बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, आयटीसी, मारुती, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा एल अॅण्ड टी, विप्रो, टाटा स्टील, रिलायन्स, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. 


निफ्टीतील 50 पैकी 46 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, 4 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. सिप्ला, एचसीएल टेक, सन फार्मा आणि एशियन पेंट्सच्या शेअर दरात वाढ दिसून येत आहे. 


बाजारात सोमवारी दिसली तेजी 


सेन्सेक्सने सोमवारी 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना निफ्टी 18 हजारांच्या जवळ पोहोचला होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 322 अंकांनी वधारून 60,115 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 103 अंकांच्या वाढीसह 17,936 अंकांवर बंद झाला. सोमवारी बाजार सुरू होतानाच तेजीसह सुरू झाला. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रातील समभाग तेजीत होते. बँक निफ्टी, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मेटल्स वाढीसह बंद झाले होते.