Share Market Open Today : भारतीय शेअर बाजारात आत चांगली सुरुवात झाली आहे. सहा दिवस घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार आज (17 मार्च) सुरुवातीच्या सत्रात तेजी असल्याचं दिसत आहे. आज बाजार उघडताच सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) नफ्यासह तेजीत व्यवहार करत आहेत. 


शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक


गेले सहा दिवस बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. गुरुवारीही बाजाराची घसरणीसह सुरुवात मात्र बाजार बंद होताना या घसरणीला ब्रेक लागला. आज सुरुवातीच्या सत्रात मेटल, आयटी, बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. INFOSYS आणि HCL TECH हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स आहेत. तर, भारती एअरटेल टॉप लूजर आहे.


अशी झाली शेअर बाजाराची सुरुवात


आज शेअर बाजारात व्यवहार सुरु होताच बीएसईचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 530 अंकांच्या वाढीसह 58,160 वर पोहोचला. तर एनएसईचा (NSE) निर्देशांक निफ्टीने सुमारे 135 अंकांच्या वाढीसह 17,130 चा टप्पा ओलांडला. आज दिवसभरातील सेन्सेक्स आणि निफ्टीच्या हालचालींवर जागतिक बाजाराचा परिणाम होऊ शकतो. विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचाही बाजाराच्या हालचालीवर परिणाम होईल.


डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण


आज शेअर बाजारात आयटी, बँकिंग सेक्टरचे शेअर्स तेजीत आघाडीवर आहेत. इन्फोसिसचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 25 पैशांनी मजबूत झाला होता. आज रुपया 82.73 वरुन 82.49 प्रति डॉलरवर घसरला.


प्री-ओपनमधील परिस्थिती कशी होती?


आज प्री ओपनिंगमध्ये देशांतर्गत शेअर बाजारात मजबुतीची चिन्हे दिसत होती. सिंगापूरमध्ये, NSE निफ्टी फ्युचर्स SGX निफ्टी सकाळच्या सुमारास सुमारे 122.50 अंकांनी म्हणजे 0.72 टक्क्यांनी तेजीत होता. यामुळे देशांतर्गत शेअर बाजारातील व्यापाराची आज जोरदार सुरुवात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. प्रो-ओपनिंग सत्रादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तेजीत होते. सत्र सुरु होण्यापूर्वी सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी वर गेला होता. निफ्टीही 125 अंकांपेक्षा अधिक तेजीत होता.


आज तेजीत असलेले शेअर्स


आज बाजारात इन्फोसिस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, अल्ट्रा सिमेंट, एचसीएल टेक, एल अँड टी, एचडीएफसी बँक, कोटक बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, पावरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, रिलायन्स, नेस्ले इंडिया, मारुती हे शेअर्स तेजीत आहेत.


'या' शेअर्समध्ये घसरण 


आज आयटीसी (ITC), सनफार्मा (Sunpharma), टीसीएस (TCS), भारती एअरटेल या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरुच, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय?