Share Market Opening 1 August: देशांतर्गत शेअर बाजाराने (share market) आज ऑगस्ट महिन्याची चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी सेन्सेक्सनं (sensex) 82 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीही 25 हजारांवर गेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (Share Market) नवा इतिहास रचला गेला. कारण निफ्टीने 50 ने इतिहासात प्रथमच 25 हजार अंकांची पातळी गाठली आहे.
सुमारे 200 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स सकाळी 9.15 वाजता उघडला. निफ्टीने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आणि 76 अंकांच्या वाढीसह 25,027 अंकांवर उघडला. सुरुवातीच्या सत्रात बाजार उत्साही दिसत असून तेजीत सातत्याने वाढ होत आहे. व्यवहाराच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सनेही नवा इतिहास रचला आणि पहिल्यांदाच ८२ हजारांचा टप्पा पार केला.
जगभरातील शेअर बाजारात मोठा उत्साह
सकाळी 9.20 वाजता, सेन्सेक्स सुमारे 350 अंकांच्या मोठ्या वाढीसह 82,100 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर निफ्टी 115 अंकांच्या वाढीसह 25,065 अंकांच्या जवळ होता. अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर जगभरातील बाजारात उत्साह आहे. एक दिवस आधी म्हणजे बुधवारी अमेरिकन बाजारात चांगली वाढ झाली होती. वॉल स्ट्रीटवरील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजमध्ये 0.24 टक्के वाढ झाली. त्याचप्रमाणे, S&P 500 मध्ये 1.58 टक्के आणि Nasdaq कंपोझिट इंडेक्समध्ये 2.64 टक्के वाढ झाली आहे. आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण आहे. जपानचा निक्केई 2.20 टक्के आणि टॉपिक्स 2.48 टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, दक्षिण कोरियाची कोस्पी 0.42 टक्के आणि कोस्डॅक 1.38 टक्के नफ्यात आहे. हाँगकाँगच्या हँग सेंगमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
बहुतांश मोठे समभाग तेजीत
सुरुवातीच्या व्यापारात बहुतांश मोठे समभाग तेजीत आहेत. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सवरील 23 हून अधिक समभाग नफ्यात होते. मारुती सुझुकीमध्ये सर्वाधिक 2.50 टक्के वाढ दिसून आली आहे. जेएसडब्ल्यू स्टीलही दोन टक्क्यांहून अधिक मजबूत होता. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स सारख्या समभागांमध्ये 1 ते 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा 1.70 टक्क्यांहून अधिक तोट्यात आहे. इन्फोसिसचे शेअर्स 0.50 टक्क्यांहून अधिक घसरले होते. शेअर बाजारातील तेजी ही गुंतवणुकदारांसाठी दिलासा देणारी आहे. गेल्या काही काही दिवसांपासून शेअर बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहेत. या तेजीचा गुंतवणूकदारांना फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: