Share Market News : आठवड्याचा दिवस उजाडला की शेअर मार्केटकडे डोळे लावून बसलेल्यांना आठवड्याच्या सुरुवातीला दिलासा मिळाला आहे.  गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात  (Share Market) असलेला खरेदीचा जोर आज या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कायम आहे. आज बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात (Share Market) खरेदीचा जोर दिसून येत आहे.  सेन्सेक्स (Sensex updates) 240 अंकांनी वधारला आहे तर निफ्टी 74 अंकांनी वर गेला आहे.  निफ्टी बॅंक निर्देशांकातही 155 अंकांची उसळी दिसून येत आहे. 


डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी कमकुवत


डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी कमकुवत झाला आहे. आता रुपया 79.63 प्रति डॉलरवर उघडला आहे. मेटल आणि आयटी क्षेत्रातील समभागात चांगली तेजी दिसून येत आहे.  हिंदाल्को, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस आणि रिलायन्सच्या समभाग उसळी घेतली आहे. कच्च्या तेलाचे भाव 93 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. तेलाच्या किंमती खाली आल्यानंतर पुन्हा 4 टक्क्यांनी वधारल्या आहेत. 


प्री-ओपन सत्रापासून बाजार मजबूत


प्री-ओपन सत्रापासूनच देशांतर्गत बाजार मजबूत स्थितीत दिसून येत आहे.  प्री-ओपन सत्रातसेन्सेक्स सुमारे 120 अंकांच्या वाढीसह 59,915 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. NSE निफ्टी 60 अंकांनी वाढून 17,890 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. सकाळी 09:20 वाजता सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 60,090 अंकांच्या जवळ पोहोचला होता. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 72 अंकांनी वाढून 17,900 च्या वर व्यवहार करत होता.


गेल्या आठवड्यातव्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला होता. बँक निफ्टीने 40500 अंकांचा टप्पा ओलांडला होता तर सेन्सेक्सने (Sensex) बाजार सुरू होताच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला होता, ज्यात नंतर काहीशी घसरण झाली होती. भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेतील शेअर्स तेजीत होते तर सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, आयटीसी, मारूती, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एल अॅण्ड टी, विप्रो, टाटा स्टील, एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, इन्फोसिसच्या शेअर दरात वाढ झाली होती. 



इतर महत्त्वाची बातमी: