Share Market Updates : आजपासून चार दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद असणार आहे. आजपासून चार दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद असणार आहेत. ही शेअर बाजारातील सर्वात मोठी सुट्टी ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
आज गुरुवारी, 14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि जैन धर्मातील 24 वे तीर्थंकार महावीर स्वामी यांचीदेखील जयंती आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार बंद असणार आहे. तर, शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. तर, शुक्रवारी आणि शनिवारी बाजारातील व्यवहारांना सुट्टी असते. सध्याच्या आठवड्यात शेअर बाजारात फक्त तीन दिवस व्यवहार झाले. शेअर बाजारातील ही मोठी सुट्टी असल्याचे म्हटले जाते. दिवाळीत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते.
बँकांनाही तीन दिवस सुट्टी
बँकांनाही तीन दिवस सुट्टी असणार आहे. गुरुवार, शुक्रवारी बँकांना सुट्टी असणार आहे. तर, शनिवारी बँका सुरू असणार आहेत. त्यानंतर रविवारी बँका बंद असणार आहेत. सलग सुट्ट्यांमुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
बुधवारी बाजार घसरणीसह बंद
बुधवारी शेअर बाजारावर विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले. सेन्सेक्स बुधवारी 58,910.74 अंकावर सुरू झाला होता. बुधवारी बाजार बंद होताना 237.44 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर, निफ्टीदेखील 17,599.90 अंकावर सुरू झाला. त्यानंतर विक्रीचा जोर दिसून आला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा निफ्टीत 54.65 अंकाची घसरण दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जोरदार 'सेलिब्रेशन'; पहिल्या लाटेच्या तुलनेत मद्यविक्री 2000 कोटींनी वाढली
- Inflation Rates : गेल्या वर्षभरात महागाईत झपाट्याने वाढ! खाद्यपदार्थांपासून शिक्षण ते इंधनापर्यंत सर्वच वस्तू महागल्या, जाणून घ्या याचा परिणाम