Stock Market Closing On 6th March 2023: धुळवडीच्या दिवशी बाजार बंद असला तरी गुंतवणूकदारांवर आज चांगलाच होळीचा रंग चढला आहे. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांची जबरदस्त खरेदी झाली. आयटी आणि बँकिंग शेअर्सच्या खरेदीमुळे शेअर बाजार उच्च पातळीवर बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 451 अंकांच्या वाढीसह 60,266 वर बंद झाला. तसेच नॅशनल राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 127 अंकांच्या उसळीसह 17,718 अंकांवर बंद झाला.
Stock Market Closing On 6th March 2023: सेक्टर इंडेक्समध्ये काय स्थिती?
आज दिवसभरातील व्यवहारात रिअल इस्टेट आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे निर्देशांक वगळता सर्वच क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, धातू. ऊर्जा, इन्फ्रा, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स चांगल्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 स्टॉक्सपैकी 25 स्टॉक्स वाढीसह बंद झाले. तर केवळ 5 स्टॉक्स घसरले. तर निफ्टीच्या 50 स्टॉक्सपैकी 38 स्टॉक्स वधारले तर 12 स्टॉक्स घसरणीसह बंद झाले.
इंडेक्स | कोणत्या अंकांवर स्थिरावला | दिवसातील उच्चांक | दिवसातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 60,238.46 | 60,498.48 | 60,005.65 | |
BSE SmallCap | 28,090.55 | 28,209.74 | 27,881.51 | 0.88% |
India VIX | 12.27 | 12.47 | 11.84 | 0.72% |
NIFTY Midcap 100 | 30,960.05 | 31,093.95 | 30,825.75 | 0.85% |
NIFTY Smallcap 100 | 9,442.10 | 9,484.65 | 9,386.75 | 1.12% |
NIfty smallcap 50 | 4,256.65 | 4,272.65 | 4,232.55 | 1.19% |
Nifty 100 | 17,506.30 | 17,586.05 | 17,467.80 | 0.01 |
Nifty 200 | 9,190.05 | 9,228.45 | 9,167.55 | 0.01 |
Nifty 50 | 17,711.45 | 17,799.95 | 17,671.95 | 0.0067 |
Stock Market Closing On 6th March 2023: ट्रेंडिंग स्टॉक
आज दिवसभरातील व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस 5.50 टक्के, टाटा मोटर्स 2.83 टक्के, ओएनजीसी 2.56 टक्के, एनटीपीसी 2.43 टक्के, पॉवर ग्रिड 2.27 टक्के, इन्फोसिस 1.90 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.88 टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या स्टॉक्समध्ये ब्रिटानिया 2.09 टक्क्यांनी, टाटा स्टील 1.26 टक्क्यांनी, जेएसडब्ल्यू 1.18 टक्क्यांनी, हिंदाल्को 0.58 टक्क्यांनी घसरले.
Stock Market Closing On 6th March 2023: गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगलीच झेप घेतली आहे. आजच्या व्यवहारात, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 265.49 लाख कोटी रुपये झाले आहे, तर शुक्रवारी ते 263.34 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात जबरदस्त तेजीत झाली. आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा ओलांडला. निफ्टीने 17680 ची पातळीही ओलांडली आहे. बँक निफ्टीने आज जोरदार सुरुवात केली आणि 41525 चा टप्पा पार केला. आज बाजाराची सुरुवात चांगल्या तेजीत झाली आहे आणि बीएसईचा 30 शेअर्स निर्देशांक उघडण्याच्या वेळी 198.07 अंक होता. बीएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 86.00 अंक होता. सेन्सेक्समधील 30 स्टॉक्सपैकी 28 शेअर वधारले आणि 2 घसरले होते.