मुंबई:  दिवसभर शेअर बाजारात (Share Market) चढ-उतार दिसून आला. मात्र, दिवसअखेर सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. या आठवड्यात सलग चार ट्रेडिंग सेशनमध्ये खरेदीचा जोर दिसला. आजच्या व्यवहारात बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. तर, मिड कॅप इंडेक्सने (Mid Cap Index) आतापर्यंतचा उच्चांक गाठला. आजचा व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 385 अंकांच्या तेजीसह 66,265 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 116 अंकांच्या तेजीसह 19,727 अंकांवर बंद झाला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आज दिवसभरातील व्यवहारात बँक निफ्टीत तेजी दिसून आली. बँक निफ्टीत 469 अंकांची तेजी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 55,878  अंकांवर स्थिरावला. त्याशिवाय, ऑटो, आयटी, मीडिया, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू,ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. हेल्थकेअर, एफएमसीजी, फार्मा सेक्टरमधील स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये आजही तेजी दिसून आली. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टीमधील 50 पैकी 31 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

इंडेक्‍सकिती अंकांवर बंददिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल 
BSE Sensex66,249.4366,296.9065,672.3400:08:04
BSE SmallCap38,109.3338,169.6538,041.040.42%
India VIX10.8711.039.801.83%
NIFTY Midcap 10040,593.9040,619.1540,284.100.77%
NIFTY Smallcap 10012,734.1512,773.3512,674.900.47%
NIfty smallcap 505,860.805,880.605,825.450.61%
Nifty 10019,690.5019,703.0019,533.150.57%
Nifty 20010,564.2010,570.1010,485.450.60%
Nifty 5019,727.0519,737.0019,550.050.59%

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.77 लाख कोटींची वाढ

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात आज 7 सप्टेंबर रोजी वाढ झाली. आजच्या तेजीमुळे बाजार भांडवल 319.10 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आधीच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार भांडवल बुधवार, 6 सप्टेंबर रोजी 317.33 लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आजच्या दिवशी कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे 1.77 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. 

2198 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ 

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या बहुतांशी कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,807 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2198 शेअर्स तेजीसह बंद झाले. तर. 1,490 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर 130 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 289 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 16 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा  52 आठवड्यांच्या नवीन नीचांकी दर गाठला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: