Share Market Closing Bell:  या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. दिवाळी आधी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू आहे. बँकिंग, एफएमसीजी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 146 अंकांनी वधारत 59,107 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 30 अंकांच्या तेजीसह 17,516  अंकांवर बंद झाला. 


बाजारात आज तेजी दिसून आली असली तरी विक्रीचा जोर दिसून आला. बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आलेल्या कंपन्यांची संख्या अधिक दिसून आली. आज बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3671 कंपन्यांपैकी 1652 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1761 शेअर दरात घसरण दिसून आली. 158 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. बाजारात 228 कंपन्यांच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले असून 146 कंपन्यांच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 274.67 अब्ज डॉलर इतके झाले. 


आज भारतीय शेअर बाजारात बँकिंग, फार्मा, एफएमसीजी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, ऑटो, आयटी, मेटल्स, एनर्जी आदी सेक्टरमध्ये नफावसुली दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये किंचित तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील फक्त 18 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 32 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 20 शेअर घसरणीसह बंद झाले.


नेस्ले कंपनीच्या शेअर दरात 2.14 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 2.13 टक्के, रिलायन्समध्ये 1.88 टक्के, आयटीसी 1.79 टक्के, अॅक्सिस बँक 1.69 टक्के, एचडीएफसी बँक 1.02 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.89 टक्के, पॉवरग्रीड 0.68 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. 


तर, एनटीपीसी 1.77 टक्के, एसबीआय 1.64 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.54 टक्के, एचसीएल टेक 1.41 टक्के, डॉ. रेड्डी 1.12 टक्के, इन्फोसिस 1.03 टक्के, मारुती सुझुकी 0.92 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


दरम्यान, शेअर बाजारात आजही तेजीसह  सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताने भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 59,196.96 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 17,568.15 अंकांवर खुला झाला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: