Share Market Closing Bell: दिवसभरात शेअर बाजारात (Share Market Updates) आज अस्थिरता दिसून आली. गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ सुरू असताना दुसरीकडे नफावसुलीदेखील झाली. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बाजार बंद होताना तेजी दिसून आली. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 200 अंकांनी वधारला. तर, निफ्टी (Nifty) 17800 च्या पातळीजवळ स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 203 अंकांच्या तेजीसह 59,959 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 49.85 अंकांनी वधारत 17,786 अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 10 शेअर दरात घसरण दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 30 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 19 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
सेन्सेक्समध्ये मारुतीच्या शेअर दरात 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, एचडीएफसी, टायटन, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, एल अॅण्ड टी, नेस्ले, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
आयटीसी, एचसीएल टेक, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, अॅक्सिस बँक, एसबीआय, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा आणि टाटा स्टीलच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा खरेदीचे संकेत दिसून आले होते. सेन्सेक्स सुरुवातीच्या काही वेळेतच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. त्यानंतर निर्देशांकात घसरण झाली. निफ्टी निर्देशांकातही तेजी दिसून आली होती. मात्र, नफावसुली झाल्याने बाजारात घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांकात काही वेळेसाठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर पुन्हा तेजी दिसली.
निफ्टी ऑटो, निफ्टी एनर्जी, निफ्टी इन्फ्रा, आदी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी आयटी, निफ्टी मेटल, निफ्टी पीएसयू बँक, आदी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: