Sensex Closing Bell : आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) सकारात्मक राहिले. जागतिक बाजारातील संकेत आणि कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल यामुळे गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात आयटी, ऊर्जा समभागात तेजी आली. मिड कॅपमध्येही खरेदी दिसून आली, आजच्या व्यवहाराअंती बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 367 अंकांच्या उसळीसह 66,527 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 108 अंकांच्या उसळीसह 19,753 अंकांवर बंद झाला. आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.52 लाख कोटींची वाढ झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधील (Sensex) 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील (Nifty 50) 50 पैकी 36 कंपन्यांच्या शेअर्स दर वधारले.
कोणत्या सेक्टरमध्ये तेजी-घसरण
आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑटो, फार्मा, रिअल इस्टेट, मीडिया, मेटल्स, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्येही तेजी दिसून आली. निफ्टीचा मिड कॅप इंडेक्सने सर्वकालिक उच्चांक गाठला. मिड कॅपमध्ये 1.03 टक्क्यांची तेजी दिसून आली. एफएमसीजी, हेल्थकेअर सेक्टरमध्ये स्टॉक्स घसरणीसह बंद झाले.
इंडेक्स | किती अंकांवर बंद | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 66,527.67 | 66,598.42 | 65,998.90 | 0.56% |
BSE SmallCap | 35,002.32 | 35,039.71 | 34,662.29 | 00:18:52 |
India VIX | 10.41 | 11.19 | 10.14 | 2.74% |
NIFTY Midcap 100 | 37,721.35 | 37,757.15 | 37,352.65 | 0.97% |
NIFTY Smallcap 100 | 11,702.85 | 11,712.90 | 11,639.00 | 0.88% |
NIfty smallcap 50 | 5,294.75 | 5,299.50 | 5,247.85 | 1.19% |
Nifty 100 | 19,679.35 | 19,697.45 | 19,545.00 | 0.50% |
Nifty 200 | 10,445.90 | 10,454.80 | 10,372.00 | 0.57% |
Nifty 50 | 19,753.80 | 19,772.75 | 19,597.60 | 0.55% |
गुंतवणूकदारांनी 2.52 लाख कोटी रुपये कमावले
मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 31 जुलै रोजी 306.68 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवार, 28 जुलै रोजी 304.16 लाख कोटी रुपये होते. BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
1470 समभाग घसरले
मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आज मोठ्या प्रमाणात शेअर्स वाढीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,878 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,209 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,470 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 199 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 331 समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 50 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.