Sensex Closing Bell :  कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजार बंद झाले. सेन्सेक्स (BSE Sensex) 388 अंकांनी घसरला. तर निफ्टी (NSE Nifty) 19,400 अंकांच्या पातळीखाली बंद झाला. आजच्या घसरणीमुळे शेअर बाजारात लोकांचे सुमारे 58 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधील 30 कंपन्यांच्या शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 388.40 अंकांनी किंवा 0.59 टक्क्यांनी घसरून 65,151.02 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 99.75 अंकांनी किंवा 0.51 टक्क्यांनी घसरून 19,365.25 वर बंद झाला.

जागतिक पातळीवर काय घडले?

अमेरिकेच्या केंद्रीय बँकांनी व्याजदरात आणखी एक वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्याच वेळी, चीनची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त मंदावली आहे. त्यामुळे गुरुवारी बाजारातील वातावरण कमकुवत असल्याचे दिसून आले. 

बँकिंग, एनर्जी, फार्मा, हेल्थकेअर, एफएमसीजी, युटिलिटी, ऑईल अॅण्ड गॅसच्या शेअर्समध्ये  सर्वाधिक घसरण दिसून आली. तथापि, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या निर्देशांकांत किंचीत तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 17 कंपन्यांचे शेअर्स तेजीत दिसून आले. 

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावलादिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE MidCap30,390.1030,537.1630,355.510.00
BSE Sensex65,151.0265,535.1465,046.10-0.59%
BSE SmallCap35,364.2835,520.7335,318.600.19%
India VIX12.2412.6712.110.95%
NIFTY Midcap 10037,895.5038,013.8037,832.900.25%
NIFTY Smallcap 10011,745.3011,811.1511,731.650.14%
NIfty smallcap 505,341.355,366.005,328.600.22%
Nifty 10019,264.6019,361.6019,236.30-0.48%
Nifty 20010,263.9510,308.5510,249.55-0.38%
Nifty 5019,365.2519,461.5519,326.25-0.51%

गुंतवणूकदारांचे 58 हजार कोटी बुडाले 

शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी 303.90 लाख कोटी रुपयांवर घसरले. मागील व्यवहाराच्या दिवशी,  बुधवार, 16 ऑगस्ट रोजी बाजार भांडवल 304.48 लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आजच्या व्यवहारात बाजार भांडवलात सुमारे 58 हजार कोटींची घसरण झाली आहे. 

1839 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) बहुतांशी शेअर्स तेजीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,740 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1839 कंपन्यांच्या शेअर्स दरात तेजी दिसून आली. त्याच वेळी 1738 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर 164 कंपन्यांच्या शेअर्स कोणत्याही बदल झाला नाही. आजच्या दिवसभरातील व्यवहारादरम्यान 231 कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 31 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांच्या नवीन 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. आजच्या व्यवहारात एकाही कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किट गाठले नाही. तर, 4 कंपन्यांच्या शेअर दराने लोअर सर्किट गाठले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :