Amber Heard : हॉलिवूडमधील (Hollywood) सर्वात चर्चेचा असणारा अॅक्वामॅन -2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधील अभिनेत्री अॅम्बर हर्ड (Amber Heard) ही सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात कठिण परिस्थिशी सामना करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान तिचा सहकलाकार जेसन मोमोआ (Jason Momoa) याने देखील तिच्याबाबत अनेक दावे केले आहेत. तर या दोघांबाबत अनेक अफवा देखील सध्या हॉलिवूडच्या सिनेसृष्टीत पसरु लागल्या आहेत. मोमोआ आणि हर्ड यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तर त्यांच्या चित्रपटानंतर तिच्यापेक्षा जास्त तिच्या सहकलाकाराचे जास्त कौतुक केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिच्या करिअरला देखील उतरती कळा लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. पण यामध्ये अॅम्बर हर्ड हिच्या कामावर मात्र प्रेक्षक नाराज असल्याचं समोर येत आहे.
सध्या तिचा काळ संघर्षाचा
पण सध्या अॅम्बर हर्डसाठी हा कठीण काळ असल्याच्या चर्चा देखील जोर धरु लागल्या आहेत. त्यामुळे अॅक्वामॅनच्या दुसऱ्या भागामधून जरी तिचं दमदार पुन्हा एकदा पदार्पण होणार असलं तरीही हर्डला बॉक्स ऑफिससाठी बराच संघर्ष करावा लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अॅम्बर हर्ड ही 3 डेज टू किल आणि पाइनॅपल एक्सप्रेस या छोट्या-बजेट चित्रपटांमध्ये झळकली होती. त्यानंतर जस्टिस लीग या चित्रपटाच्या माध्यमातून जेसन मोमोआसोबत तिने प्रिन्सेस मेरा म्हणून काम केलं.
आणि तिच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली
तिची सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती Aquaman मधली भूमिका. ज्याला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाने 1.14 अब्ज डॉलरची विक्रमी कमाई केली होती. पण त्यानंतर तिच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. तिचा पती जॉनी डेपसोबतचा सुरु असलेला मानहानीचा खटला हे त्याचे मुख्य कारण ठरले. या खटल्यामध्ये न्यायालयाने निर्णय हा तिचा पती जॉनी डेप याच्या बाजूने दिला होता. त्यामुळे हर्डला 10.35 दशलक्ष डॉलर द्यावे लागले होते. त्यामुळे तिच्यावर आर्थिक संकट देखील ओढावलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
तर सध्या अॅम्बर हर्डच्या प्रसिद्धीला लागलेल्या उतरत्या कळेमुळे अनेक निर्मात्यांनी देखील तिच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण अॅक्वामॅनच्या दुसऱ्या भागामध्ये तिच्यापेक्षा तिच्या सहकलाकाराचे जास्त कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेलरनंतर चित्रपट रिलीज झाल्यानंतर तरी हर्डच्या परिस्थितीमध्ये बदल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.