Share Market Closing Bell:  आज शेअर बाजारात ऐतिहासिक (Sensex Rise) उसळण दिसून आली. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने (Sensex) ऐतिहासिक टप्पा गाठला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 62 हजार अंकांचा टप्पा गाठला. बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांकानेदेखील आतापर्यंतचा उच्चांक गाठला. 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 762 अंकांनी वधारत 62,272  अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 216 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 18,484  अंकांवर स्थिरावला. आज दिवसभरातील व्यवहारात 1886 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. त्याशिवाय, 1494 कंपन्यांचे शेअर दर घसरले. त्याशिवाय, 133 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.   


आज शेअर बाजारात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा आदी सेक्टरमधील शेअर दरात तेजी दिसून आली. बँक निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. बँक निफ्टीने 43,000 अंकांचा टप्पा ओलांडत 43,075 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील 50 पैकी 43 कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. तर, 7 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 


बाजारात,  इन्फोसिसचा शेअर दर 2.93 टक्क्यांनी वधारला. तर, एचसीएल टेक 2.59 टक्के, पॉवरग्रीड 2.56 टक्के, विप्रो 2.43 टक्के, टेक महिंद्रा 2.39 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 2.05 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 1.99 टक्के, एचयूएलच्या शेअर दरात 1.69 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 1.68 टक्क्यांची तेजी दिसून आली. सन फार्मा कंपनीच्या शेअर दरात 1.58 टक्क्यांची उसळण दिसून आली. 


सेन्सेक्स निर्देशांकातील चार कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. त्यामध्ये टाटा स्टीलच्या शेअर दरात 0.14 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 0.11 टक्के, बजाज फायनान्सच्या शेअर दरात 0.10 टक्के, कोटक महिंद्रा 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. 


बाजारात आज सकाळपासून निर्देशांक वधारला होता. त्यामुळे बाजारात खरेदीचे संकेत मिळत होते. मुंबई शेअर बाजार निर्देंशांक सेन्सेक्स (Sensex) 157 अंकांच्या तेजीसह 61,667 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 58 अंकांच्या तेजीसह 18326 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सने ऐतिहासिक टप्पा गाठला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: