Share Market Closing Bell: नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशीदेखील भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज तेजी दिसून आली. बाजारात आज दिवसभरातील व्यवहारात खरेदी-विक्री दरम्यान जोर दिसून येत होता. त्यामुळे बाजारात अस्थिरता दिसून आली होती. मात्र, बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 126 अंकांच्या तेजीसह 61,294 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 37 अंकांच्या तेजीसह 18,234 अंकांवर बंद झाला. 


शेअर बाजारात आज व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1998 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1423 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 130 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्सुरन्स, अॅक्सिस बँक, टायटन कंपनी, टीसीएसच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 






अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 2.18 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. त्याशिवाय, टायटनच्या शेअर दरात 1.87 टक्के, टीसीएस शेअर दरात 1.54 टक्के, टेक महिंद्राच्या शेअर दरात 1.38 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.83 टक्के, रिलायन्स 0.70 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. 


शेअर बाजारात आज, दिवसभरातील  व्यवहारात  ऑटो, एफएमसीजी, मीडिया, एनर्जी आणि मेटल्स सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्समध्येही घसरण दिसून आली. तर, बँकिंग, आयटी, फार्मा, हेल्थकेअरसारख्या सेक्टरच्या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 12 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 


दरम्यान, शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 92.91 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 61,074.88 वर खुला झाला. तर, निफ्टी 34.25 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 18,163.20 वर खुला झाला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: