Share Market Updates :  भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस चांगलाच ठरला. अदानी समूह (Adani Group) आणि बँकिंग स्टॉक्समध्ये (Banking Stocks) दिसून आलेल्या खरेदीच्या उत्साहामुळे बाजार वधारला. आज, शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 882 अंकांच्या तेजीसह  59,797  अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 266 अंकांच्या तेजीसह 17,589 अंकांवर बंद झाला. 

आज दिवसभरातील व्यवहारात सगळ्याच सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. बँकिंग सेक्टरच्या स्टॉक्समध्ये चांगलीच तेजी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 2.09 टक्क्यांनी वधारला. एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस, हेल्थकेअर सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. मिडकॅप  आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली. निफ्टीतील 50 पैकी 40 शेअर्समध्ये तेजी दिसली. तर, 10 कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 कंपन्यांचे शेअर्स वधारले.


आज, डॉलरच्या तुलनेत रुपया 63 पैशांनी मजबूत झाला. आज रुपया 81.96 वर स्थिरावला.


या शेअर्समध्ये तेजी

आज दिवसभरातील व्यवहारात, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 17 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, अदानी पोर्ट्स 10 टक्के, एसबीआय 5.14 टक्के, भारती एअरटेल 3.28 टक्के, रिलायन्स 2.55 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. तर, टेक महिंद्रामध्ये 2.22 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात एक टक्का, सिप्लामध्ये 0.88 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स  किती अंकांवर स्थिरावला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 59,795.65 59,967.04 59,231.58 1.50%
BSE SmallCap 27,833.97 27,905.16 27,714.69 0.64%
India VIX 12.18 12.97 11.98 -6.09%
NIFTY Midcap 100 30,697.65 30,768.60 30,600.75 0.69%
NIFTY Smallcap 100 9,337.35 9,366.10 9,295.55 0.81%
NIfty smallcap 50 4,206.60 4,221.95 4,191.55 0.77%
Nifty 100 17,385.95 17,433.90 17,241.40 1.50%
Nifty 200 9,124.95 9,149.05 9,056.85 1.39%
Nifty 50 17,594.35 17,644.75 17,427.70 0.02

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

भारतीय शेअर बाजारात आज दिसून आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. आजच्या दिवसभरातील व्यवहारात मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 263.34 लाख कोटी रुपये झाले. गुरुवारी बाजार भांडवल गुरुवारी 259.98 लाख कोटी रुपये इतके होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.36 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.


Share Market Opening : प्री- ओपनिंगमध्येही चांगले संकेत

BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही प्री-ओपनिंगपासून तेजीच्या स्थितीत होते.  शेअर बाजारात व्यवहार सुरु झाला तेव्हा बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांनी वधारत 59,400 अंकांच्या जवळ पोहोचला. त्याचप्रमाणे निफ्टीने सुमारे 115 अंकांच्या वाढीसह 17,475 चा टप्पा ओलांडला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: