Share Market News : मागील काही दिवसांपासून घसरण सुरू असलेला सेन्सेक्स (Sensex) आज तेजीसह बंद झाला. आज बाजारात दिवसभर अस्थिरता दिसून आली होती. त्यानंतर आयटी सेक्टरमधील (IT Sector) स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर वाढल्याने बाजार वधारत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 142.43 अंकांनी वधारत 60,806.22 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 21.80 अंकांनी वधारत 17,893.50 अंकांवर स्थिरावला. भारतीय रुपयाचा दर आज दोन पैशांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82.51 वर स्थिरावला. बुधवारी 82.49 वर रुपया स्थिरावला होता 

आज शेअर बाजारात व्यवहार झालेल्या सूचीबद्ध कंपन्यांपैकी 1670 कंपन्यांचे शेअर वधारले. तर, 1714 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 142 कंपन्यांच्या शेअर दरात कोणाताही बदल झाला नाही. अदानी एंटरप्रायझेस, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि जेएसडब्लू स्टील या कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. तर, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी लाइफ, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

बाजारातील दिवसभरातील चित्र

आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, बँकिंग, मीडिया सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, एफएमसीजी, ग्राहकपयोगी वस्तू आदी सेक्टरमधील स्टॉक्सच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. मिड कॅप इंडेक्स तेजीसह आणि स्मॉल कॅप इंडेक्स घसरणीसह स्थिरावले. निफ्टी 50 मधील 25 कंपन्यांचे शेअर दर वधारले आणि 25 कंपन्यांच्या शेअर दर घसरले. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली आणि 10 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 

इंडेक्‍सकिती अंकावर बंददिवसातील उच्चांकदिवसभरातील नीचांकी स्तरकिती टक्के बदल
BSE Sensex60,844.8760,863.6360,472.810.003
BSE SmallCap28,138.3328,210.5728,081.74-0.11%
India VIX13.0413.8212.06-4.08%
NIFTY Midcap 10030,956.6531,036.6530,846.750.0004
NIFTY Smallcap 1009,475.059,491.059,433.90-0.04%
NIfty smallcap 504,281.054,286.304,255.200.00
Nifty 10017,723.8517,751.6517,625.250.00
Nifty 2009,289.009,304.009,241.050.00
Nifty 5017,893.4517,916.9017,779.800.00

या शेअर दरात चढ-उतार

आज दिवसभरातील व्यवहारात बजाज फायनान्समध्ये 1.59 टक्क्यांची तेजी दिसून आली. बजाज फिनसर्व्ह 2.30 टक्के, एशियन पेंट्स 1.80 टक्के, इन्फोसिस 1.76 टक्के, इंडसंइड बँक 1.51 टक्के, लार्सन 0.74 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 0.64 टक्क्यांची तेजी दिसून आली.  

भारती एअरटेलच्या शेअर दरात 1.03 टक्क्यांची घसरण दिसून आली. अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.92 टक्के, टाटा मोटर्स 0.78 टक्के, सन फार्मा 0.65 टक्के, एचडीएफसी 0.53 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट

शेअर बाजार आज तेजीसह बंद झाला. मात्र, गुरुवारी बाजार भांडवलात घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल घटले असून 268.45 लाख कोटी इतके झाले आहे. बुधवारी बाजार भांडवल 268.62 लाख कोटी रुपये इतके होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे जवळपास 17000 कोटींचे नुकसान झाले आहे.