Share Market Closing Bell : आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाजार (Share Market) तेजीसह बंद झाला. आयटी-बँकिंग कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे सकाळपासून बाजारात जोरदार तेजी दिसून आली. जागतिक पातळीवरील शेअर बाजारात दिसून आलेल्या सकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. 

आज दिवसभरातील व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 355.06 अंकांच्या तेजीसह 57,989.90 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 114.40 अंकांनी वधारत17,100 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, मेटल्स, ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर मीडिया, हेल्थकेअर, एफएमसीजी, ऑटो, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 21 कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर 9 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. निफ्टी 50 कंपन्यांपैकी 37 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 13 कंपन्यांचे शेअर दर घसरणीसह बंद झाले. निफ्टी आयटी 1.18 टक्क्यांनी आणि निफ्टी बँक निर्देशांक 1.19 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.

इंडेक्‍स किती अंकावर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 58,087.07 58,178.94 57,503.90 00:11:14
BSE SmallCap 27,195.70 27,248.12 27,062.32 0.80%
India VIX 14.77 16.22 14.6 -8.94%
NIFTY Midcap 100 30,092.25 30,284.60 29,983.10 00:04:36
NIFTY Smallcap 100 9,094.60 9,135.85 9,062.45 0.69%
NIfty smallcap 50 4,127.95 4,144.15 4,114.50 0.89%
Nifty 100 16,964.80 17,014.30 16,843.00 00:09:39
Nifty 200 8,909.30 8,938.55 8,849.65 00:08:56
Nifty 50 17,100.05 17,145.80 16,958.15 00:09:39

या स्टॉक्समध्ये तेजी

आजच्या ट्रेडिंग सत्रात एचसीएल टेक 3.58 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 2.53 टक्के, नेस्ले 2.32 टक्के, टाटा स्टील 1.90 टक्के, कोटक महिंद्रा 1.63 टक्के, इन्फोसिस 1.04 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. आयटीसी 1.51 टक्क्यांनी, मारुती सुझुकी 1.48 टक्क्यांनी, एनटीपीसी 1.25 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 1.14 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगली वाढली. शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 257.59 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर गुरुवारी ते 256.21 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.38 लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.