Share Market Closing :  मावळते आर्थिक वर्ष 2022-23 ला भारतीय शेअर बाजाराने (Share Market) उत्साहात निरोप दिला. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसून आला. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 1000 अंकांनी वधारत बंद झाला. सेन्सेक्स 1031 अंकांच्या तेजीसह  58,991 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 279 अंकांच्या तेजीसह 17,359 अंकांवर स्थिरावला. 

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रात 1.75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय निफ्टी आयटी सेक्टरमध्ये 2.45 टक्क्यांनी वधारला. एफएमसीजी, एनर्जी, ऑटो, इन्फ्रा, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील समभागातही लक्षणीय वाढ झाली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप क्षेत्रातील समभागही वधारत बंद झाले. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांचे शेअर वधारले.  तर चार कंपन्यांचे शेअर घसरले. निफ्टी 50 मधील 43 कंपन्यांचे शेअर वधारले. तर, 7 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

इंडेक्‍स किती अंकांवर बंददिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex58,991.5259,068.4758,273.860.0178
BSE SmallCap26,957.0127,033.4926,692.091.35%
India VIX12.9413.6312.0725-5.08%
NIFTY Midcap 10030,035.1530,144.1529,907.050.0087
NIFTY Smallcap 1008,994.759,023.358,903.300.0161
NIfty smallcap 504,097.704,127.704,070.150.0139
Nifty 10017,186.1517,206.8517,036.100.0158
Nifty 2009,007.909,019.458,934.801.49%
Nifty 5017,359.7517,381.6017,204.651.63%

 

या शेअर्समध्ये तेजी-घसरण

आजच्या व्यवहारात रिलायन्स 4.29 टक्क्यांनी वधरला. नेस्ले 3.30 टक्के, इन्फोसिस 3.19 टक्के, आयसीआयसीआय बँक 3.08 टक्के, टाटा मोटर्स 2.80 टक्के, टीसीएस 2.16 टक्के, विप्रो 1.80 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर सन फार्मा 0.77 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.27 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 0.24 टक्क्यांनी, टायटन 0.05 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप वाढून रु. 258.19 लाख कोटी इतके झाले आहे. तर, बुधवारी ते रु. 254.77 लाख कोटी होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.42 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

बाजार सुरू होताच तेजी 

जागतिक बाजारातील (Global Market) चांगल्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) जोरदार तेजी दिसून आली. बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) 58500 च्या वर व्यवहार करत होता. तर, निफ्टीही (Nifty) 17250 च्या पातळीवर होता. 

बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद

 बुधवार भारतीय शेअर बाजारासाठी (Stock Market) चांगला ठरला. बुधवारी, बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार बुधवारी वधारल्याचं पाहायला मिळालं. काल शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 346 अंकांच्या तेजीसह  57,960 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 129 अंकांच्या तेजीसह 17,080 अंकांवर बंद झाला.