Share Market Closing Bell :  आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) विक्रीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे बाजारावर घसरणीचा दबाव दिसून आला. बँकिंग (Nifty Bank) आणि आयटी सेक्टरमध्ये (Nifty IT) नफावसुली दिसून आली. तर, दुसरीकडे मिड कॅप (Mid Cap) आणि एफएमसीजी (FMCG) सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 107 अंकांच्या घसरणीसह 66,160  आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 14 अंकांच्या घसरणीसह 19,646 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये तेजी-घसरण

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी क्षेत्रातील शेअर्स वधारून बंद झाले. फार्मा, मेटल्स, एनर्जी, एफएमसीजी, मीडिया, रिअल इस्टेट, कन्ज्युर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभाग वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 तेजीसह आणि 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50  शेअर्सपैकी 29 कंपन्यांचे शेअर्स वधारले. 

कोणत्या शेअर्समध्ये खरेदी-विक्रीचा जोर?

आज दिवसभरातील व्यवहारात एनटीपीसीच्या शेअर्स दरात 4.11 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 3.09 टक्के, जेएसडब्लू स्टीलच्या शेअर दरात 1.36 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 1.36 टक्के, बजाज फायनान्समध्ये 1.23 टक्के, रिलायन्समध्ये 0.85 टक्के, एशियन पेंट्समध्ये 0.85 टक्के, आयटीसीचा शेअर 0.72 टक्क्यांनी वधारत स्थिरावला. 

एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 1.81 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, बजाज फिनसर्वमध्ये 1.76 टक्के, टाटा मोटर्समध्ये 1.66 टक्के, टीसीएसमध्ये 1.21 टक्के, एचसीएल टेकमध्ये 1.14 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 66,160.20 66,351.22 65,878.65 -0.16%
BSE SmallCap 34,548.46 34,577.99 34,421.47 00:07:03
India VIX 10.14 10.81 10.04 -3.59%
NIFTY Midcap 100 37,357.15 37,378.05 37,135.95 0.55%
NIFTY Smallcap 100 11,600.30 11,636.50 11,560.00 0.19%
NIfty smallcap 50 5,232.30 5,250.85 5,217.20 0.29%
Nifty 100 19,580.65 19,606.45 19,498.55 0.07%
Nifty 200 10,386.60 10,394.75 10,343.50 0.14%
Nifty 50 19,646.05 19,695.90 19,563.10 -0.07%

1695 शेअर्समध्ये घसरण

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आज  तेजीसह बंद झालेल्या शेअर्सची  संख्या अधिक असल्याचे दिसून आले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,691 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,824 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी 1,695 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 172 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. 

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

आज मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 28 जुलै रोजी वाढून 304.09 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 27 जुलै गुरुवारी हे बाजार भांडवल 303.50 लाख कोटी होते. BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. आज, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 59 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.