Iran Israel War News: मध्यपूर्वेत सुरु असलेल्या इराण आणि  इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विपरीत पडसाद उलटले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या संसदेत होर्मुर्झची सामुद्रधुनी बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय जलवाहतूक आणि व्यापारी जहाजांना मध्य पूर्वेतून अरबी समुद्रात ये-जा करण्यासाठी होर्मुर्झची सामुद्रधुनी महत्त्वाची मानली जाते. मात्र, आता ही सामुद्रधुनी बंद झाल्यास त्याचा जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या सगळ्याचे पडसाद सोमवारी भारतीय शेअर बाजारात उमटताना दिसले. भारतीय शेअर बाजारात सोमवारी सकाळी जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 700 अंकांनी कोसळून 81,707 या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीतही 170 अंकांची घसरण झाली असून हा निर्देशांत 24 हजार 900 या पातळीच्या खाली घसरला आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणविरुद्धचा हा संघर्ष आणखी काही काळ सुरु राहिल्यास त्याचा भारतालाही फटका बसू शकतो. या भीतीचे प्रतिबिंब सध्या शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

Crude Oil rates hike: इस्रायल-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत तब्बल 18 टक्क्यांनी वाढली

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचं प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते खामेनेई घेणार आहेत. जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. 

इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत तब्बल 18 टक्क्यांनी वाढली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत आता 75 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास पोहोचली आहे. अमेरिका मैदानात उतरल्याने कच्च्या तेलाची किंमत आता 120 डॉलर्स प्रतिडॉलर्सपर्यंत जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जगातील २० टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत वाढून ब्रेंट क्रूड ८० डॉलर्सवर गेलंय. युद्ध लांबल्यास ब्रेंट क्रूडचे दर १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतं अशी भीती आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसेल. तसेच यामुळे देशातील महागाईदेखील वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणचा कडवा प्रतिकार, इस्त्रायलवर 40 बॅलेस्टिक मिसाईलचा मारा, 'खेबर शिकन'चा पहिल्यांदा वापर