मुंबई :  आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या व्यवहारात मिड कॅप (Mid Cap) आणि स्मॉल कॅप (Small Cap) सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा  65,000 अंकांचा टप्पा पार केला. आज दिवसभरातील व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 80 अंकांच्या तेजीसह 65,076 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 37 अंकांच्या तेजीसह 19,342 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आजच्या सत्रात ऑटो, आयटी, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू , ऑइल अॅण्ड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. हेल्थकेअर, एफएमसीजी, फार्मा सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.  तर निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 38 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

टाटा स्टीलच्या शेअर दरात  आज 1.66 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, टेक महिंद्रा 1.60 टक्के, एनटीपीसी 1.21 टक्के, जेएसडब्लू स्टीलच्या शेअर दरात 1.15 टक्के, पॉवरग्रीड 1.09 टक्के, एचसीएल टेक 1.05 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.05 टक्के, एचडीएफसी बँक 0.90 टक्के, टाटा मोटर्समध्ये 0.88 टक्के, टायटन कंपनीच्या शेअर दरात 0.88 टक्क्यांची तेजी दिसून आली.  तर, भारती एअरटेलच्या शेअर दरात 1.75 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, 1.06 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 0.96 टक्के, रिलायन्सच्या शेअर दरात 0.91 टक्के, सन फार्मामध्ये 0.45 टक्के, कोटक महिंद्रामध्ये 0.42 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स किती अंकावर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,075.82 65,229.03 64,956.67 0.12%
BSE SmallCap 36,547.63 36,581.89 36,375.11 0.69%
India VIX 12.23 12.46 10.65 -1.39%
NIFTY Midcap 100 38,794.80 38,844.00 38,708.85 0.34%
NIFTY Smallcap 100 12,021.65 12,040.65 12,003.70 0.54%
NIfty smallcap 50 5,524.35 5,537.00 5,514.40 0.63%
Nifty 100 19,291.25 19,313.15 19,259.45 0.25%
Nifty 200 10,311.55 10,320.95 10,294.20 0.26%
Nifty 50 19,342.65 19,377.90 19,309.10 0.19%

गुंतवणूकदारांना 1.12 लाख कोटींचा फायदा 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 29 ऑगस्ट रोजी 309.04 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारी, बाजार भांडवल 307.92 लाख कोटी रुपये होते. शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळे मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात आज सुमारे 1.12 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

2,082 कंपन्यांचे शेअर वधारले 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी आज बहुतांशी कंपन्यांचे शेअर वधारले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,748 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,082 शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,516 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 150 कंपन्यांच्या  शेअर्स दरात कोणताही बदल झाला नाही.  याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 217 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर,  30 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला.