SBI News Update : तुमचे अकाउंट जर भारतीय स्टेट बँकेत (SBI)असेल आणि तुम्हाला जर अकाउंटसंबंधित काही मेसेज येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण कुठूनही आलेल्या या लिंकवर क्लिक केल्यास त्याचा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो, तुमच्या अकाउंटवरून सगळे पैसे उडू शकतात. त्यामुळे अशा मेसेजला रिप्लाय करु नका असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे. 


तुमच्या मोबाइलवर  बँकेच्या अकाउंट संबंधित एक मेसेज येइल. त्यामध्ये एका लिंकचा समावेश असेल. संबंधित लिंकवर जर तुम्ही चुकूनही क्लिक केले तर तुमचे अकाउंट तात्पुरते  लॉक होऊ शकतं. स्कॅम करणाऱ्या भामट्यांकडून हे  मेसेज  पाठवले जात आहेत. असे मेसेज तुमच्या मोबाइलवर आल्यास ते दुर्लक्षित करावेत.  त्याला उत्तर न देणे आणि  आणि त्याबद्दल तक्रार करणेही महत्त्वाचे आहे. सरकारी अधिकृत पीआयबी फॅक्ट चेकने एसबीआयच्या ग्राहकांना अशा मेसेज स्कॅम करणाऱ्यापासून सावध राहायला सांगितले आहे. 


याठिकाणी करू शकाल तक्रार


पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एसबीआयच्या ग्राहकांना एक फसवणुकीचा मेसेज पाठवला जात आहे. त्यावर क्लिक केल्यास तुमचे अकाउंट काही काळापुरते बंद पडू शकते. तसेच पीआयबीने (PIB) सांगितले की, अशा कोणत्याही प्रकारच्या मेसेजला किंवा ईमेलला उत्तर देऊ नये. तसेच आपले बँकेचे डिटेल्स शेअर करू नये. मात्र अशा प्रकारचा कोणताही  मेसेज आल्यास report.phishing@sbi.co.in वर कळवा. 


लिंकवर क्लिक केल्यास काय होऊ शकते


स्कॅम करणाऱ्या भामट्यांकडून आलेल्या मेसेजला तुम्ही उत्तर दिले तर  बँक खात्यात जमा केलेले पैसे गायब होण्याचा धोका वाढेल. स्कॅमर तुमचा वैयक्तिक डेटा चोरून तुमच्या अकाउंटमधून पैसे काढू शकतो. ज्यामुळे अशा लिंकवर 
चुकूनही क्लिक करू नये. 


फसवणूक होऊ नये म्हणून काय करायला हवे?
 
आपली वैयक्तिक माहिती कधीही अशा ईमेल किंवा एसएमएस (SMS)तसेच व्हॉटसअप  मेसेजला शेअर करू नका. या संबंधित कोणताही मेसेज आल्यास  तात्काळ report.phishing@sbi.co.in वर कळवा. तुम्ही 1930 नंबर वर त्वरीत कॉल करू शकता.


बँकेचा इशारा काय?


एसबीआयने म्हटले आहे की, ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती जसे की खाते क्रमांक, पासवर्ड आणि इतर संवेदनशील माहिती टेक्स्ट मेसेजद्वारे कधीही देऊ नये. असा कोणताही मेसेज आल्यास त्याची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्ही (SBI) शाखा किंवा ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकता. बँकेने म्हटले आहे की बँक कधीही कोणत्याही ग्राहकाची वैयक्तिक माहिती विचारत नाही.