State Bank of India: भारतीय स्टेट बँकेने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदांसाठी घेतलेल्या पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एसबीआयची परिक्षा दिली होती, त्या विद्यार्थ्यांना sbi.co.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. हा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे.  त्यानंतरच विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. देशभरात २ हजार ५६ प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी  २०, २१ आणि २७ नोव्हेंबर २०२१ ला परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मुख्य परिक्षेसाठी पात्र होणार आहेत. अद्याप, मुख्य परिक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. 


कसा पाहणार निकाल? 


विद्यार्थ्यांना प्रथम sbi.co.in या वेबासाईटवर जावं लागेल. त्यानंतर होमपेजवर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा निकाल अशी लिंक असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. नव्या विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यानंतर निकाल पाहता येणार आहे. स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेची गुणवत्ता यादी प्रवर्गानुसार जाहीर केली जाते. जेवढ्या पदांची भर्ती करायची आहे त्याच्या दहापट उमेदवारांना मुख्य परीक्षेला संधी दिली जाते.  2 हजार 56 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. भारतीय स्टेट बँकेतील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी  अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण झालेली कोणत्याही  शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक असते.


दरम्यान, देशातील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.  एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर्स मुख्य परीक्षेची अ‌ॅडमिट कार्ड येत्या काही दिवसांमध्ये स्टेट बँकेच्या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. मुख्य परीक्षेची तारीख लवकरच जाहीर झाली नसून, लवकरच ती एसबीआयच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.