SBI News : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. स्टेट बँकेने कर्जाच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ केली आहे. SBI ने MCLR, EBLR आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटचे बेस रेट वाढवले आहेत. नवीन दर आजपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. MCLR हा किमान व्याजदर आहे. ज्यावर कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाला कर्ज देऊ शकते. SBI ने आपल्या व्याजदरात किती वाढ केली आहे हे देखील पाहुयात.
सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका
चालू आर्थिक वर्षात आरबीआयने व्याजदरात बदल केला नसला तरी बँका कर्जाच्या ईएमआयमध्ये सातत्याने वाढ करत आहेत. SBI ने MCLR आणि RLLR सोबत EBLR देखील त्याच्या बेस रेटमधून वाढवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. SBI ने बेस रेट 10.10 टक्क्यांवरुन 10.25 टक्के केला आहे. याबाबत बोलायचे झाले तर त्यातही वाढ झाली आहे. SBI चा MCLR दर 8 टक्के ते 8.85 टक्के असेल. रात्रीचा MCLR दर 8 टक्के आहे, तर एक महिना आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर 8.15 टक्क्यांवरून 8.20 टक्के झाला आहे.
सहा महिन्यांचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढला आणि व्याजदर 8.55 टक्के झाला आहे. एक वर्षाचा MCLR, जो अनेक ग्राहक कर्जांशी जोडलेला आहे. आता 0.10 टक्क्यांनी 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR देखील 10 आधार अंकांनी वाढवण्यात आला आहे. त्यानंतर दर अनुक्रमे 8.75 टक्के आणि 8.85 टक्के झाले आहेत.
EBLR आणि BPLR मध्ये देखील वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाचा बाह्य बेंचमार्क जोडलेला दर म्हणजे EBLR 9.15 टक्के + CRP + BSP आहे. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 8.75 टक्के + CRP आहे. दोन्ही दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट म्हणजेच BPLR 15 डिसेंबर रोजी 25 bps ने वार्षिक 15 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. जो पूर्वी 14.85 टक्के होता.
सणासुदीच्या हंगामात गृह कर्ज ऑफर
आपल्या विशेष सणासुदीच्या मोहिमेदरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) गृहकर्जाच्या व्याजदरांवर 65 बेस पॉइंट्सपर्यंत सूट देत आहे. ही सवलत रेग्युलर होम लोन, फ्लेक्सिपे, एनआरआय, पगार नसलेल्या, स्वतःच्या घरावर लागू आहे. गृहकर्जावर सूट देण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. बँक आता 8.4 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. टॉप-अप हाउस लोनवरही सवलत उपलब्ध आहे. विशेष मोहिमेअंतर्गत, SBI टॉप-अप हाऊस लोनवरील व्याज दर वार्षिक 8.9 टक्के पासून सुरू होतात.
महत्त्वाच्या बातम्या:
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकेची खास योजना, अधिक नफा कमावण्याची सर्वोत्तम संधी