स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 नोव्हेंबर 2021 पासून पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत बँकेतील पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. SBI ने या नवीन सुविधेचे नाव व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट ( Video Life Certificate Service) असं ठेवलं आहे. त्यामुळे ज्या पेन्शनधारकांना बँकेत जाणे शक्य नसेल ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात


एक सोपी, सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये पेन्शनधारकाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. यासाठी निवृत्तीवेतनधारकांना अधिकृत वेबसाइट https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रॉप डाउनमधून 'व्हिडिओ एलसी' निवडल्यानंतर तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. यानंतर पेन्शनधारकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करुन नियम आणि अटी स्वीकारा आणि 'स्टार्ट जर्नी' वर क्लिक करा अशी माहिती एसबीआय प्रशासनानं दिली आहे. 


>> यासाठी पॅन कार्ड आवश्यक 


* व्हिडिओ कॉल दरम्यान पॅन कार्ड तयार ठेवल्यानंतर, 'मी तयार आहे'  हा पर्याय निवडा


* व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी, कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्थानाशी संबंधित परवानग्या द्या.


* SBI अधिकारी व्हिडिओ कॉलवर येईल.


* आपण इच्छेनुसार आपल्या सोयीनुसार व्हिडिओ कॉल शेड्यूल करू शकता.


* व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर पेन्शनधारकाला पडताळणी कोड मिळेल. तो संबंधित अधिकाऱ्यांना सांगा.


* व्हिडिओ कॉलवर तुमचे पॅन कार्ड दाखवा. एसबीआय अधिकारी ते कॅप्चर करतील


* एसबीआय अधिकारी पेन्शनधारकांचा फोटोही काढतील आणि त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.



नोंदणीसाठी खालील पर्याय वाचा
एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास वेबसाईट तयार केली आहे. पेन्शनधारकाला या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे लॉग इन करून वापरु शकता. या वेबसाइटमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित अनेक कामे सुलभ होणार आहेत. वेबसाईटद्वारे, वापरकर्ते थकबाकी गणना पत्रक डाउनलोड करू शकतात.


तुम्ही वेबसाइटद्वारे पेन्शन स्लिप किंवा फॉर्म-16 देखील डाउनलोड करू शकता. याशिवाय पेन्शन प्रोफाइल तपशील, गुंतवणुकीची माहिती आणि जीवन प्रमाणपत्राची स्थिती देखील तपासली जाऊ शकते. बँकेत केलेल्या व्यवहारांची माहितीही या वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.


परंतु अफरातफरी पासून सावध राहा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.