Government Employees : यावर्षी लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Elections) होणार आहेत. यासाठी पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) बाबतीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी दोनदा वाढ करते. ही वाढ जुलै आणि जानेवारी महिन्यात महागाई भत्त्याच्या (Dearness allowance) रुपात करण्यात आली आहे. मात्र, चालू वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक  दोघेही महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोन्हींची एकूण संख्या ही एक कोटी आहे.


महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता 


सीपीआय-आयडब्ल्यूच्या आकडेवारीवरुन असे दिसते की यावेळी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. नंतर एकूण महागाई भत्त्याचा आकडा 50 टक्क्यांवर पोहोचू शकतो. सध्या महागाई भत्ता 46 टक्के आहे. गेल्या वेळीही महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. सध्या 7 व्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता दिला जातो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) नवीन ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असणार आहे. 


सध्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अनुक्रमे 46 टक्के महागाई भत्ता देते. केंद्र सरकारनं 18 ऑक्टोबर 2023 रोजी डीए मध्ये शेवटची वाढ जाहीर केली होती. ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू झाली आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआरमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळते. महागाई भत्ता हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराचा एक भाग आहे. त्याचा उद्देश महागाईचा प्रभाव कमी करणे हा आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रभावी वेतनात वेळोवेळी सुधारणा केली जाते.


कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होणार वाढ


केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी, डीए वाढल्याने पगारात वाढ होणार आहे. समजा जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 53500 रुपये असेल. अशा स्थितीत 46 टक्क्यांनुसार सध्याचा महागाई भत्ता 24,610 रुपये असेल. आता डीए 50 टक्के वाढल्यास ही रक्कम 26,750 रुपये होईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात 26,750 - 24,610 = 2,140 रुपयांची वाढ होणार आहे. 


पेन्शनधारकांना किती होणार लाभ? 


केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना लागू होणारी महागाई सवलत DA प्रमाणेच आहे. DR वाढल्याने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. समजा केंद्र सरकारच्या पेन्शनधारकाला दरमहा 41100 रुपये मूळ पेन्शन मिळते. 46 टक्के डीआर दराने पेन्शन मिळवणाऱ्यांना 18906 रुपये मिळतात. जर त्यांचा DR 50 टक्के झाला, तर त्यांना महागाईपासून दिलासा म्हणून दरमहा 20,550 रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, जर लवकरच डीएमध्ये 4 टक्के वाढ झाली, तर त्यांची पेन्शन दरमहा 1,644 रुपयांनी वाढणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


रोज फक्त 7 रुपयांची गुंतवणूक करा, महिना 5000 रुपये मिळवा; योजनेबाबत सविस्तर माहिती एका