मुंबई : शेअर बाजारात (Stock Market) अशा काही कंपन्या असतात ज्या आपल्या गुंतवणूकादांना दमदार रिटर्न्स मिळवून देतात. तर काही कंपन्या अशा असतात ज्यांच्यात गुंतवणूक केल्यास तोटा होण्याची शक्यता असते आझाद इंजिनिअरिंग या कंपनीने मात्र आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही महिन्यांत मालामाल केलं आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजारवर या कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


शेअरचे मूल्य 13 टक्क्यांनी वाढले


आझाद इंजिनिअरिंग या कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांची वाढ झाल्याने याा कंपनीच्या शेअरचे मूल्य 1670.25 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या कंपनीचा एका मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड या जपानी कंपनीशी एक मोठा करार झाला आहे. त्यामुळेच या कंपनीच्या शेअरचा भाव थेट 13 टक्क्यांनी वाढला आहे.


700 कोटींची ऑर्डर मिळाली


आझाद इंजिनिअरिंग या कंपनीने मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीशी लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट अँड प्राइस अॅग्रीमेंटवर (LTCPA) हस्ताक्षर केले आहेत. हा करार एकूण 700 कोटी रुपयांचा आहे. आझाद इंजीनिअरिंगने (Azad Engineering) दिलेल्या माहितीनुसार या कराराच्या सध्याच्या टप्प्याचे मूल्य 700 कोटी रुपये आहे. एकूण पाच वर्षांत या कराराअंतर्गतच्या कामाला पूर्ण करावे लागणार आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात इंजिनिअरिंगने हनीवेल एअरोस्पेस लिमिटेड या कंपनीकडून 134 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. मित्सुबिशी या कंपनीकडून 700 कोटींची ऑर्डर मिळाल्यानंतर या कंपनीकडे एकूण किती रुपयांच्या ऑर्डर्स आहेत, हे कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.  


आयपीओ आला तेव्हा मूल्य होते 524 रुपये  


आझाद इंजीनिअरिंग या कंपनीचा आयपीओ 20 डिसेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. 22 डिसेंबर 20203 पर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येत होती. आयपीओ आला तेव्हा कंपनीने आपल्या शेअरचे मूल्य 524 रुपये निश्चित केले होते. 28 डिसेंबर 2023 रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली होती. यावेळी 524 रुपयांचा शेअर 710 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीचा शेअर आता 4 नोव्हेंबर 2024 रोजी 1670.25 रुपयांपर्यंत वाढलेला आहे. या कंपनीचा आयपीओ 83.04 पटीने सबस्क्राईब झाला होता. 


सचिन तेंडुलकरकडून पाच कोटींची गुंतवणूक 


भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यालादेकील या कंपनीने प्रभावित केले होते. तेंडुलकरने मार्च 2023 मध्ये आझाद इंजिनिअरिंग या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावेळी 136.92 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने तेंडुसकरने या कंपनीचे एकूण 3,65,176 शेअर्स घेतले होते. जून 2024 पर्यंतच्या डेटानुसार सचिनने गुंतवलेल्या रकमेचे मूल्य 14.56 पटीने वाढले होते.  सचिनने गुंतवलेल्या पैसांचे मूल्य 72.37 कोटींपर्यंत वाढले होते. बिझनसे टुडेच्या एका वृत्तात याबाबत माहिती दिलेलीा हे. दरम्यान, सध्या सचिनने या कंपनीत केलेली गुंतवणूक काढून घेतली आहे, अद्यापही सचिनची ही गुंतवणूक कायम आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.  


हेही वाचा :


फक्त 5000 रुपयांची SIP अन् करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या नेमकं कसं?


स्विगी सोबतच 'या' जबरदस्त कंपनीचा आयपीओ आला, बम्पर कमाईसाठी पैसे ठेवा तयार!


आयपीओ येण्याच्या दोन दिवसांआधी मोठी घडामोड, 'या' कंपनीने जमवले 366 कोटी रुपये!