Reliance Jio Result: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) देशातील दूरसंचार क्षेत्र बदलून टाकलं आहे. ही कंपनी मुकेश अंबानींसाठी फायदेशीर ठरली आहे. कारण, रिलायन्स जिओने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. कर आणि इतर खर्च वजा केल्यावर कंपनीचा निव्वळ नफा 5,208 कोटी रुपये झाला आहे.


जिओच्या नफ्यात वार्षिक आधारावर 12.3 टक्क्यांची वाढ 


तीन महिन्यांच्या कालावधीत रिलायन्स जिओच्या नफ्यात वार्षिक आधारावर 12.3 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 2016 मध्ये लॉन्च झालेला रिलायन्स जिओ सतत विस्तारत आहे. कंपनीने अनेक नवीन सेवा सुरू केल्या आहेत आणि आज ती देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे देशातील सर्वात मोठे 4G आणि 5G नेटवर्क आहे.


महसुलातही 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ


ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये रिलायन्स जिओच्या महसुलातही झपाट्याने वाढ झाली आहे. 10.3 टक्के वाढीसह ते 25,368 कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 26.3 टक्के राहिले आहे. या कालावधीत कंपनीचा खर्च 18,518 कोटी रुपये झाला आहे. जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीत ते 18,063 कोटी रुपये होते. तर एका वर्षापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत ते 16,839 कोटी रुपये होते.


देशभरात जिओचे  सुमारे 45 कोटी वापरकर्ते 


रिलायन्स जिओचे देशभरात सुमारे 45 कोटी वापरकर्ते आहेत. ही देशातील नंबर 1 दूरसंचार कंपनी आहे. रिलायन्स जिओने देशातील पहिला 4G फीचर फोनही सादर केला. यामुळे कंपनीला देशातील मोठ्या 2G बेसचे 4G मध्ये रूपांतर करण्यास मदत झाली. रिलायन्स जिओने स्वस्त इंटरनेट योजना आणून भारतीय बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. यानंतर देशातील इतर दूरसंचार कंपन्या, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया यांनाही आपले प्लॅन कमी करावे लागले. 


महत्त्वाच्या बातम्या:


आता जिओ भारताबाहेर विस्तारणार, श्रीलंकेच्या सरकारी टेलिकॉम कंपनीवर अंबानींची नजर