Reliance AGM 2021 LIVE Updates: मुकेश अंबानी म्हणाले, अक्षय ऊर्जेमध्ये 60 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार; 2030 पर्यंत 100 GW सौर उर्जा निर्मितचे लक्ष्य

Reliance AGM 2021 LIVE Updates : भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज 44 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीचे अपडेट्स आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये पहायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jun 2021 03:13 PM
मुकेश अंबानी म्हणाले, अक्षय ऊर्जेमध्ये 60 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार; 2030 पर्यंत 100 GW सौर उर्जा स्थापित करणार

ग्लोबल न्यू एनर्जीवर जोर देताना मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या 44 व्या वार्षिक बैठकीत सांगितले की 2021 मध्ये ते New Energy BIZ सुरू करतील. ते म्हणाले की न्यू Energy व्यवसायात रिलायन्स अग्रणी असेल. एक 4 गिगा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. अक्षय ऊर्जेसाठी 60 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

रिलायन्सच्या बैठकीचं यूट्यूबवर स्ट्रिमिंग

भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज 44 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये रिलायन्सचे प्रमुख आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेअर होल्डर्सना संबोधित करणार आहेत. त्याचे यूट्यूबवर स्ट्रिमिंग होणार असल्याने मुकेश अंबानी आज काय घोषणा करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

पार्श्वभूमी

Reliance AGM 2021 : आज होणार धमाका! रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी करु शकतात 'या' घोषणा
भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज 44 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये रिलायन्सचे प्रमुख आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेअर होल्डर्सना संबोधित करणार आहेत. या दरम्यान मुकेश अंबानी आपल्या ऑईल टू केमिकल (O2C) कंपनीचा व्यवहार, स्वस्त 5G फोन, कंज्युमर फेसिंग रिटेल आणि इतर काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्सच्या या बैठकीकडे उद्योग जगतासोबतच सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे. 


आज दुपारी दोन वाजता रिलायन्सची ही व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. रिलायन्सच्या ऑईल-टू-केमिकल (O2C) आणि सौदी अरबची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरामको (Saudi Aramco) यांच्या दरम्यान 15 अब्ज रुपयांच्या व्यवहाराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यामध्ये रिलायन्सच्या ऑईल टू केमिकलच्या 20 टक्के भागिदारी विक्रीसंबंधी बोलणी सुरु आहे. पण गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता त्यामध्ये फारशी काही प्रगती झाली नव्हती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना या व्यवहाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.  


5G फोन लॉन्च होण्याची शक्यता
रिलायन्सने आपला पहिला  5G फोन Google आणि JioBook सोबत मिळून लॉन्च करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यावर अनेक गुंतवणूकदारांची नजर आहे. गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी तशी घोषणा केली होती. आजच्या बैठकीत रिलायन्सने आपला पहिला  5G फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. 


रिटेल आरआयएल साठी महत्वाची घोषणा होणार? 
रिलायन्सचे  JioMart सध्या देशातील दोनशेहून जास्त शहरात सुरु आहे. त्याच्याविषयी महत्वाची घोषणा आजच्या बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच AJIO या रिलायन्सच्या फॅशन आणि लाईफस्टाईल प्लॅटफॉर्मविषयी काही महत्वपूर्ण घोषणा होणार आहे. 


 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज 44 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर रिलायन्सचे घसरलेले शेअर्स मुकेश अंबानींच्या घोषणेनंतर वधारतील काय याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. आज होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सचे शेअर्स  0.7 टक्क्यांनी म्हणजे 15 रुपयांनी घसरुन 2190 रुपयांवर आले आहेत. मुकेश अंबानींच्या घोषणेनंतर रिलायन्सचे शेअर्स वधारतील काय अशी उत्सुकता गुंतवणूकदारांना लागली आहे.


आजच्या बैठकीमध्ये रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेअर होल्डर्सना संबोधित करणार आहेत. त्याचे यूट्यूबवर स्ट्रिमिंग होणार असल्याने मुकेश अंबानी आज काय घोषणा करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.