RBI Imposed Penalty on Banks:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमयूएफजी (MUFG)बँकेवर कर्जाबाबत वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबत केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एमयूएफजी बँक ही याआधी 'द बँक ऑफ टोकियो-मित्सुबिशी यूएफजे लिमिटेड' या नावाने ओळखली जात होती. 


MUFG विरोधात तक्रार काय?


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले की,  MUFG बँकेने अशा  कंपन्यांना कर्ज दिले , ज्यांच्या संचालक मंडळात इतर बँकांच्या संचालकांचा समावेश होता. आरबीआयच्या निर्देशांचे हे उघडपणे उल्लंघन आहे. दंड ठोठावण्यासाठी हे मुख्य कारण आहे. त्याशिवाय, 11 मार्च 2019 रोजीच्या आर्थिक स्थितीबाबतच्या पर्यवेक्षण मूल्यांकनाच्या दरम्यान, अन्य गोष्टींसह बँकांद्वारे कंपन्यांना कर्ज आणि इतर निर्देशांचे पालन न केल्याचे आरबीआयला आढळले. त्यानंतर आरबीआयने MUFG ला नोटीसही बजावली होती. बँकेच्या उत्तराने आरबीआयचे समाधान झाले नाही. अखेर या बँकेला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. 



महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे पालन न केल्याबद्दल महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यातील एक बँक रत्नागिरीतील असून दुसरी बँक मुंबईतील सहकारी बँक आहे. चिपळून अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, रत्नागिरी या बँकेने काही कर्जांच्या मर्यादांबाबतच्या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला. त्याशिवाय मुंबईतील दत्तात्रय महाराज कळांबे जाऊळी सहकारी बँक लिमिटेडवरही अशाच प्रकारची कारवाई झाली आहे. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha