Aadhaar PVC Card : भारतीय विशेष ओळख प्राधिकरण म्हणजे यूआयडीएआयनं आधार PVC कार्ड बनवण्याच्या फीमध्ये वाढ केली आहे. यासाठी  आता 50 रुपयांऐवजी 75 रुपये द्यावे लागणार आहेत. नव्या दराची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

यूआयडीएआयनं मटेरिअल, प्रिंटींग आणि सुरक्षित डिलिव्हरीचा खर्च वाढल्यानं दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार PVC कार्ड प्लास्टिक कार्ड असतं. ज्यावर आधारची माहिती प्रिंट केलेली असते. हे कार्ड एटीम कार्ड सारखं असतं जे सहजपणे वॉलेटमध्ये ठेवता येतं. 

आधार PVC कार्ड एक टिकाऊ आणि वापरण्यास सोपं कार्ड आहे. हे कार्ड पॉलीविनाइल क्लोराइडद्वारे बनवण्यात येतं. हे पाण्यापासून सुरक्षित राहतं. या सुरक्षा फीचर्स देखील असतात, ज्यात क्यूआर कोड, होलोग्राम, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट असंत.

Continues below advertisement

PVC आधार कार्ड कसं तयार करायचं?

तुम्हाला जर PVC आधार कार्ड तयार करायचं असेल तर तुम्हाला प्रथम यूआयडीएआयच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 

तिथं PVC आधार कार्ड तयार करायचा पर्याय असेल. त्यावरुन अर्ज भरावा लागेल. वेबसाईटवर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करा. 

तुम्हाला याच्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी क्रमांक मिळेल तिथं नोंदवा. यानंतर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला  Next पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआय पर्यायाचा वापर करुन 75 रुपये शुल्क जमा करा. पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमची आधार PVC कार्डची प्रक्रिया पूर्ण होईल. 

आधार पीव्हीसी कार्डसाठी अर्ज मिळाल्यानंतर यूआयडीएआय 5 दिवसाच्या आत त्याचं प्रिंटींग करुन भारतीय पोस्टाद्वारे तुम्हाला पाठवून देईल. स्पीड पोस्टद्वारे आधार PVC कार्ड तुम्हाला मिळून जाईल. 

जर तुम्हाला ऑफलाईन आधार PVC कार्ड तयार करायचं असेल तर आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल. तिथं जाऊन तुम्ही आधार PVC कार्ड तयार करु शकता. 

सध्या आधार PVC कार्ड, आधार लेटर आणि ई- आधार  अशा तीन प्रकारात आधार कार्ड उपलब्ध आहे. बाजारात आधार PVC कार्ड तयार केली जातात ती वैध नाहीत, असं यूआयडीएआयनं म्हटलं. आधार PVC कार्ड रीप्रिंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  यामुळं आधार कार्डसोबत बाळगणं आणखी सोपं झालं आहे.