मुंबई : हिरे व्यापारी नीरव मोदी ( Nirav Modi) आणि मेहुल चोक्सीने (Mehul Choksi) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेचे (Brady House branch) कॅफेमध्ये (cafe) रुपांतर करण्यात आले आहे. आता या भागातील ग्राहक आरामदायी खुर्च्या आणि आलिशान सोफ्यावर बसून गरम ऑरगॅनिक कॉफीचा आनंद घेऊ शकतात. दरम्यान, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने या बँकेत तब्बल 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेली ब्रॅडी हाऊस ही इमारत एकेकाळी देशातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचे केंद्र होती. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने मार्च 2011 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन 13000 कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने अधिकाऱ्यांना लाच देऊन लुटला पैसा

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेली ब्रॅडी हाऊस ही इमारत एकेकाळी देशातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचे केंद्र होते. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन LoUs आणि परदेशी पत्रे (LLCs) वापरून मार्च 2011 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान PNB मधून 13,000 कोटी रुपयांहून अधिक सार्वजनिक पैसा लुटला होता.

फरार चोक्सीला बेल्जियममध्ये अटक 

चोक्सीला दोन आठवड्यांपूर्वी बेल्जियममध्ये अटक केल्यानंतर ब्रॅडी हाऊस पुन्हा चर्चेत आले आहे, परंतू, या शाखेचे कामकाज काही वर्षांपूर्वी फोर्टमधील सर पीएम रोडवरील पीएनबी हाऊसमध्ये हलवण्यात आले आणि हा परिसर भाड्याने देण्यात आला आणि येथे एक कॉफी कॅफे सुरू आहे.

सीबीआयकडून तपास सुरु 

जानेवारी 2018 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. जेव्हा PNB ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फसवणूकीचा अहवाल सादर केला होता. तसेच केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे तक्रार दाखल केली. या घटनेच्या आधीच चोक्सी आणि नीरव मोदी देशातून पळून गेले होते. सध्या सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या घोटाळ्याची चौकशी करत आहेत.

मार्च 2019 मध्ये, मोदींना सीबीआय आणि ईडीच्या आरोपांवर आधारित प्रत्यार्पण वॉरंटवर लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. बेल्जियम फेडरल पोलीस सेवेने भारतीय एजन्सींच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या आधारे 12 एप्रिल रोजी चोक्सीला अटक केली. PNB घोटाळ्याशी संबंधित विविध घडामोडी चालू असताना, एका पॉश कॅफेमध्ये रूपांतरित झालेल्या ब्रॅडी हाऊसवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

महत्वाच्या बातम्या:

Bacchu Kadu : धक्कादायक! फरार नीरव मोदीची संपत्ती अमरावतीत; प्रकरण उजेडात येताच बच्चू कडू कडाडले, म्हणाले....