मुंबई : डिएचएफएलने 2.60 खोट्या गृह कर्ज खात्यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेमध्ये मोठा घोटाळा केला आणि त्या माध्यमातून सरकारकडून 1880 कोटी रुपयांचे व्याज अनुदान लाटल्याचा आरोप ठेवत सीबीआयने डीएचएफएलच्या मालकांवर गुन्हा नोंद केला आहे. 


डीएचएफएलचे कपिल वधवान आणि धिरज वधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून 14,046 कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली. ज्यांच्या नावावे खाती काढण्यात आली होती त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आलं. 


कपिल वधवान आणि धिरज वधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित मनी लॉन्ड्रिगच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 1,887 कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 


सीबीआयने सांगितल्या प्रमाणे, डिसेंबर 2018 पर्यंत डीएचएफएलने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 539.40 कोटी रुपयांचे अनुदान असलेली 88,651 खोटी कर्ज प्रकरणं करण्यात आली. 2007 ते 2019 या दरम्यान खोट्या कर्ज खात्यांच्या माध्यमातून 14,046 कोटी रुपयांची 2.60 लाख खोटी गृह कर्ज खाती तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही खाती मुंबईतील बांद्रा येथील अशा शाखेत काढण्यात आली जी बँक कधीच अस्तित्वातच नव्हती. 


पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. 2015 साली सुरु करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून गरीबांनी पक्की घरे उपलब्ध करुन देण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला आणि झोपडपट्टी धारकांना पक्की घरे बांधून देण्याचे लक्ष आहे.


महत्वाच्या बातम्या :