PM Ujjwala Yojana News: आज (8 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं (Modi government) मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानं सर्वसामान्यांना महिलांना दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारनं LPG सिलेंडरवरील अनुदान (subsidy) एक वर्षासाठी वाढवले ​​आहे. PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत LPG सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे. यामुळं 12000 कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. प्रत्येक कनेक्शनवर वर्षभरात 12 अनुदानित सिलेंडर दिले जातील.


लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी मोदी सरकारनं LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत LPG सिलेंडरवर अनुदान मिळत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाची मुदत एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदान 


पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदान योजना 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सबसिडी दिल्यानं सरकारवर 12 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 सिलिंडर दिले जातील, अशी माहितीही त्यांनी सांगितली. दरम्यान, मोदी सरकारनं 29 ऑगस्ट 2023 रोजी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी LPG सिलेंडरवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असून, त्यानंतर देशात आचारसंहिता लागू होणार आहे. अशा स्थितीत या योजनेचा कालावधी वाढवणे सरकारला अवघड झाले असते. अशा स्थितीत, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत सिलेंडरवर अनुदान देण्याचा निर्णय 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे.


लाभार्थ्यांना किती रुपयात मिळतो सिलेंडर 


LPG सिलेंडर घेण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांना 903 रुपये मोजावे लागतात. 1100 रुपयांचा घरगुती एलपीजी सिलेंडर 903 रुपयांना उपलब्ध आहे. तर सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 300 रुपये अनुदान देते. म्हणजेच PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना LPG सिलेंडरसाठी फक्त 603 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांत 75 लाख एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या योजनेच्या विस्तारास मान्यता देण्यात आली आहे. 75 लाख अतिरिक्त उज्ज्वला कनेक्शनच्या तरतुदीमुळं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 10.35 कोटी होणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


आजपासून GST ते LPG 'हे' 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर ताण पडणार का?